Home बुलडाणा कुठल्याही प्रकारचा गाजावाजा अथवा गवगवा नाही .. साधेपणातून जाणवला नेता व कार्यकर्त्यांचा...

कुठल्याही प्रकारचा गाजावाजा अथवा गवगवा नाही .. साधेपणातून जाणवला नेता व कार्यकर्त्यांचा समाजधर्म ..! आपल्या समाजाभिमुख कार्याला सलाम ….!!

474

दीपक नागरे/अमीन शाह

सिंदखेडराजा:- डॉ. राजेंद्र शिंगणे हे विभागाचे आमदार तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. समाजाचे भक्कम राजकीय पाठबळ लाभलेल्या या नेत्याने कोरोना विषाणूमुळे निर्माण होणाऱ्या कोविड १९ रोगाच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर काल आपला वाढदिवस असतांनाही कुठल्याही प्रकारचा गाजावाजा व गवगवा केला नाही. फक्त काम आणि कामच केले. तसेच आपल्या कार्यकर्त्यांना सामाजिक बांधिलकी जपत नियोजन करण्याचे आवाहन केले होते.
सत्ता ही नेमकी काय असते? व तिचा अगदी ग्रामपंचायत पातळीवरुन तर राष्ट्रीय पातळीवर बेलगाम वापर करीत मस्तवालपणा दर्शविणारी अनेक उदाहरणे जनतेने पाहिली तर काहींनी अनुभवलेली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सन १९९५ पासून एक ब्रेक घेत मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाचे सलग आमदार राहिलेले डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे यांचे वैशिष्ट्य म्हणजे साधेपणाने राहणे, वागणे, होता होईल तेवढी जनसामान्यांची कामे करणे. आणि हे सर्व करीत असतांना प्रसिद्धी पासून कटाक्षाने दूर राहणे. हा त्यांचा स्वभाव सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात जवळपास सर्वांनाच माहीत आहे. मात्र काही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कुठे मुठे प्रसिद्धीसाठी यावे लागते. आणि सांप्रत काळात समाजमाध्यमावर प्रसिद्धीच्या झोतात व चर्चेत राहावे लागते याची जाणीव जवळच्या मंडळीमार्फत त्यांना करून दिली जात आहे. त्याला मन राखण्यापुरते महत्व देत डॉ. शिंगणे आपला बाणा कायम ठेवत असतात. दरवर्षी ३० मार्च रोजी त्यांचा वाढदिवस असतो. अगदी सुरुवातीच्या काळापासून त्यांनी कार्यकर्त्यांना आपल्या वाढदिवसाला कुठलाही गाजावाजा, गवगवा प्रसिद्धी न देता समाजाभिमुख कार्य करण्याचा सल्ला देत आजपर्यंतचा राजकीय प्रवास केलेला आहे.
गत अनेक दिवसांपासून यावर्षीच्या वाढदिवसाच्या तयारीसाठी कार्यकर्ते समाजोपयोगी कार्यक्रमांच्या नियोजनात व्यस्त होते. मात्र याचवेळी अचानक कोविड १९ नावाचा भस्मासुर दरवाज्यात येऊन धडकला. त्यावर इलाज काय? तर स्वतःला विलग ठेवणे ..! त्यामुळे देऊळगावराजा, सिंदखेडराजा, देऊळगावमही, अंढेरा, मेरा, साखरखेर्डा, शेंदूरजन, मलकापूर पांग्रा, बीबी, दुसरबीड, किनगावराजा आदि प्रमुख गावांसह परिसरातल्या गावखेड्यातील कार्यकर्त्यांवर हातावर हात देऊन बसण्याशिवाय काहीच करता येणे शक्य नव्हते. मात्र तरीही ठिकठिकाणी विविध प्रकारच्या मदतीचे छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आले. याचदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री राजेश उपाख्य भैय्यासाहेब टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी साखरखेर्डा व परिसरातील प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी तातडीची गरज पाहून रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यामध्ये जि. प. गटनेते राम जाधव, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुनील जगताप, माजी सरपंच कमलाकर गवई, ठाणेदार संग्राम पाटील, रामदाससिंग राजपूत, गणेशसिंग राजपुत, गणपत आबा अवचार, विजयसिंह मोहने, ईब्राहीम शहा, सैय्यद रफीक, दाउद कुरेशी, गजानन बंगाळे, कय्युम मेम्बर, शहजादखां पठाण, शे. बाबु शे. सुलेमान, शे. शफी शे. जमादार, दिलीप बेंडमाळी, विनोद बेंडमाळी, हरी मंडळकर, देवराव जगताप, भगवानसिंग राजपुत, दर्शन गवई, ज्ञानेश्वर राऊत, ललित अग्रवाल, शिवराम मुदमाळी, दिलीप खंडारे, दिलीप गवई, दत्ता घोडके, सुधाकर पऱ्हाड, शाम खरात, सुनिल रिंढे, भागवत नाईक, ईश्वर पऱ्हाड, सचिन पऱ्हाड, वैभव पवार, अमित जाधव यांच्यासह पिंपळगाव सोनारा येथील दत्तुआजा ठोसरे, सरपंच तोताराम ठोसरे, गुलाबराव वायाळ, राताळी येथील भानुदास लव्हाळे, वरुडी सरपंच भुजंगराव गारोळे, सिंदी येथील सोपानराव खरात, शिवदास आन्ना खरात, रमेश पागोरे, मदन हाडे यांच्यासह एकूण ५९ जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे यावर्षी डॉ. शिंगणे यांचा ५९ वा वाढदिवस होता. हे सर्व होत असतांनाच पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे तिकडे बुलडाण्यात आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखानंद राजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित, डॉ. सा. वा. सांगळे आदिंच्या प्रमुख उपस्थितीत कोविड १९ या रोगाच्या प्रसारासंबंधीची आढावा बैठक घेत होते. या आढाव्यानंतर त्यांनी विविध निर्देश व सूचना दिल्या तसेच नागरिकांना सोशल डिस्टनसिंगचे आवाहन केले.
त्यानंतर त्यांनी सिंदखेडराजा मतदारसंघात जाऊन कोविड १९ संदर्भात परिस्थिती जाणून घेतली. वाढदिवस असतांनाही परिस्थितीच्या गांभीर्याचे भान राखत तो दिवसभर टाळला. याकाळात असा नेता आढळणे हे दुरापास्तच आहे.
साहेब सामाजिक जाणीवेतून होणाऱ्या आपल्या सततच्या कार्याला लेखणीतून केवळ सलाम ..!