Home महत्वाची बातमी पुसेसावळीत प्राथमिक आरोग्य व पोलीस कर्मचाऱ्यांना सेफ्टी किटचे वाटप…

पुसेसावळीत प्राथमिक आरोग्य व पोलीस कर्मचाऱ्यांना सेफ्टी किटचे वाटप…

96
0

सतीश डोंगरे

मायणी / सातारा – राज्यात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भावावर या परिस्थितीत बंदोबस्तावर असणारे पोलीस कर्मचारी तसेच प्राथमिक आरोग्याचे कर्मचारी यांना येथील महेश पाटील व किरण माळवे यांनी सेफ्टी किटचे वाटप केले.

हाॅटेल व्यवसाय व खते, बि बियाणेचा व्यवसाय करीत असताना यांचेकडुन सामाजिक कार्य जोपासले जात आहे. तरी सद्या निर्माण झालेली कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेऊन
त्यांनी पोलीस कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांना सेफ्टी किटचे वाटप केले.

पुसेसावळीसह परिसरातील अनेकजणांनी असे उपक्रम राबवावेत व कोरोना बाबतचे नियम काटेकोरपणे पाळुन प्रशानाकडून दिलेल्या सुचनाचे पालन करावे असे आवाहन पुसेसावळीचे उपसरपंच सुरेश कदम यांनी केले.
यावेळी राजु माळवे, डाॅ.ए.आर. ठिगळे, डाॅ.एस.ए.डांगे,सुधीर येवले,कुंडलिक कटरे पोलीस कर्मचारी व प्राथमिक आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
( पुसेसावळी येथे दवाखाना आणि पोलिस कर्मचाऱ्यांना सामाजिक बांधीलकी जपत मास्क,ग्लोज,चष्मे व सँनिटायझर च्या किट चे वाटप )