Home बुलडाणा संचार बंदीतही कलानाथ मेडिकल ने जपली सामाजिक बांधिलकी , पोलीस बांधवांनसह पत्रकारांना...

संचार बंदीतही कलानाथ मेडिकल ने जपली सामाजिक बांधिलकी , पोलीस बांधवांनसह पत्रकारांना केले सॅनेटायझरचे मोफत वाटप.

65
0

चिखली – प्रा.तनज़ीम हुसैन

कोरोणा विषाणूच्या विळख्यात संबंध देश अडकलेले असून भारत देशातही त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे पोलीस प्रशासनासह सर्वजण खबरदारी बाळगताना दिसून येत आहेत अशातच रात्रंदिवस नागरिकांची सेवा करणाऱ्या पोलिस बांधवांना खबरदारी म्हणून स्वतःची काळजी घेण्याकरिता मोफत सॅनेटायझर चे वाटप करण्याचा निर्णय येथील कलानाथ एजन्सिज (मेडिकल) ने घेत सामाजिक बांधिलकी जपली असून राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवला आहे हे विशेष. सोशल डिस्टिंग चे पालन करीत येथील कर्तव्यावर असलेल्या बस स्टँड समोरील पोलीस बांधवांसह मुख्य डी. पी. रोडवर कर्तव्यावर असलेल्या चिखली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक गुलाबराव वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांना सॅनेटायजर चे वाटप करण्यात आले तसेच पोलीस स्टेशन कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्व पोलिस बांधवांना तसेच उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना देखील सॅनेटायजर यावेळी देण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या पोलीस बांधवांनी कलानाथ मेडिकल च्या उपक्रमाचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या आहेत. कलानाथ मेडिकलचे संचालक दिनेश भराड सूचित भराड तसेच त्यांचे सहकारी निलेश रिंढे, पत्रकार विनोद खरे, पवन लढड्डा, कैलाश शर्मा, युसूफ शेख आदींनी या कार्यात आपला सहभाग नोंदविला. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक नवीन आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे हे विशेष.

Unlimited Reseller Hosting