Home महत्वाची बातमी गोरगरिबांना विशाल जाधव यांच्याकडून १०१ कुटुंबाना घरपोच अन्न धान्य वाटप.

गोरगरिबांना विशाल जाधव यांच्याकडून १०१ कुटुंबाना घरपोच अन्न धान्य वाटप.

138
0

गोरगरिबांना विशाल जाधव यांच्याकडून १०१ कुटुंबाना घरपोच अन्न धान्य वाटप.

मजहर शेख

नांदेड ,

नांदेड/किनवट, दि :३०:- देशात कोरोना विषाणूमुळे 21 दिवसांच्या लॉकडाऊन केल्याने हातावर पोट असलेल्या गोरगरीब मजुरांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून मदतीचा रूपाने जीवनावशयक वस्तूचा घरपोच जिल्हा परिषद सदस्याचे पती विशाल जाधव यांनी मदतीचा हात म्हणून गोरगरिबांना गहू,तांदूळ, दाळ, तेलाचे वाटप केले आहे.

देशात कोरोना विषाणूमुळे 21 दिवसांच्या लॉकडाऊन केल्याने मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या गोरगरीब मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे.यात गरिबांची परिस्थिती पाहता या संकटकालिन मदतीचा हात म्हणून किनवट तालुक्यातील उमरी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या यांचे पती विशाल जाधव यांच्या हस्ते सारखणी येथील 101 कुटुंबाना पाच किलो गहू , तीन किलो तांदूळ,एक किलो दाळ, तेलाचे पॉकेट, असे साहित्य घरपोच वाटप करण्यात आले आहे. यावेळी सोमासिंग जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवरकर, पत्रकार मजहर शेख,मुजु चाऊस,आशिष राठोड,बंटी पाटील,जाविद शेख,निलेश चव्हाण,भीमराव महाजन,नवीन वाघमारे,उपस्थित होते.