Home बुलडाणा साखरखेरडा ग्रामपंचायत च्या वतीने गावात पावडर ची फवारणी ,

साखरखेरडा ग्रामपंचायत च्या वतीने गावात पावडर ची फवारणी ,

146
0

ओल्या सुख्या कचऱ्याची लावली विल्हेवाट ,

अमीन शाह

सिंदखेडराजा : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा ग्राम पंचायत च्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरातील प्रमुख मार्गावर फवारणी करण्यासाठी ग्राम पंचायत च्या वतीने विशेष फवारणी यंत्र तयार केले आहे. यामध्ये स्प्रेयर मशीनद्वारे गावातील प्रमुख रस्त्यांवर साबण आणि ब्लिचिंग पावडरच्या पाण्याची फवारणी करण्यात येत आहे. हवेमध्ये असणारे कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी साबणाचा अथवा ब्लिचिंग पावडरच्या पाण्याची फवारणी करण्यासाठी ग्राम पंचायत च्यावतीने यंत्रणा तयार करण्यात आली आहे. शहरातील विविध भागातील प्रमुख रस्त्यावर साबण आणि ब्लिचिंग पावडरच्या पाण्याची फवारणी करण्यात आली जनजागृती मोहीम बरोबरच विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता हवेतील विषाणू रोखण्यासाठी फवारणी करण्याचे पाऊल उचलण्यात आले. या वेळी सरपंच महेंद्र पाटील , ग्रामसेवक , मनोज मोरे , मंडळ अधिकारी प्रशांत पोंधे , राजू काटे , मा , उपसरपंच अय्युब सेठ कुरेशी , मा उपसरपंच शेख रफिक प्यारे , कर्मचारी रवी कुलकर्णी , आंबासकर , शांताराम गवई , मगर , आदी उपस्थित होते ,

स्वछता अभियान ,

आज साखरखेर्डा शहरात सफाई अभियान ही राबविण्यात आले ट्रॅक्टर व्दारे ओला व कोरडा कचरा जमा करून त्याची विलेहवाट लावण्यात आली ग्रामपंचायत च्या या कार्याची सर्वत्र प्रशनसा केली जात आहे ,

Unlimited Reseller Hosting