
अमीन शाह ,
सिंदखेडराजा , तालुक्यातील मोठी बाजार पेठ असलेल्या साखर खेर्डा येथे आज संपूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता येथील गर्दीचे ठिकाण असलेल्या बस स्टॅन्ड , बाजार गल्ली , जामा मस्जिद चौक , गुजरी चौक , येथील दुकाने पूर्णपणे बंद होती रस्ते ओसाड निर्मनुष्य दिसले येथील बस स्टॅन्ड पोलीस चौकी समोर दुय्यम ठाणेदार दीपक राणे , वाहतूक पो , का , राजू मापारी , पो , का , नितीन मापारी , पो , हे , का , मुंढे यांनी रस्त्यावर फिरत असलेल्या वाहन धारकांना नागरिकांना आजचा बंद कशा साठी याचे महत्व पटवून दिले व घरी थांबण्याचा सल्ला दिला , काही खाजगी दवाखाने व मेडिकल ही बंद दिसून आले ,
आरोग्य केंद्र सुरू मात्र उपचार बंद ?
आज येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होता मात्र येथे येणाऱ्या रुग्णाची तपासणी बंद होती , येथे फक्त बाहेर गाव मुंबई पुणे व इतर ठिकाण वरून आलेल्या रुग्णाची नोंद घेतल्या जात होती आज दुपार पर्यंत येथे बाहेरून आलेल्या 46 रुग्णांची नोंद करण्यात आली येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आमच्या प्रतिनिधी ने भेट दिली असता येथे एक डॉक्टर 2 आरोग्य कर्मचारी दिसून आले येथे अता पर्यंत बाहेरून आलेल्या 200 च्या वर लोकांच्या नावाची नोंद करण्यात आल्याची माहिती मिळाली डॉक्टर साहेबांनी दिली असून बाहेरून आलेल्या लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन आपली नाव नोंदणी करावी असे ही त्यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले आहे , आजच्या बंदला साखरखेर्डा वासीयांनी उत्सुर्फ पणे प्रतिसाद दिल्याचे दिसून आले , काही पत्रकार बांधव ही रस्त्यावर दिसून आले ,











































