Home बुलडाणा साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करण्याची मांगणी

साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करण्याची मांगणी

34
0

सिंदखेडराजा ,

साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जण जागृती करण्याची आवश्यकता आहे येथे उपचारासाठी दररोज सैकडो रुग्ण येत आहे जवळच्या भागातील ही अनेक रुग्ण येथे रोज येत आहे करोना आजाराची भीती प्रत्येकाला लागून आहे या जीवघेण्या आजाराची लागण होऊ नये या साठी म्हणून प्रत्येक वयक्तीने दक्षता घेणे तेवढेच गरजेचे आहे या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील शाळा , अंगणवाडी विधालाय , महाविधालाय बंद करण्यात आले आहे , करोना विषाणूचा प्रादुर्भाव कसा रोखण्यात यावा या साठी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत नागरिकांना जण जागृती करण्यात यावी अशी मांगणी येथील पत्रकार अमीन शाह यांनी जिल्हा शल्य चकित्सक यांच्या कडे केली आहे ,

घरो घरी जाऊन जनजागृती करण्याची गरज ,

जे लोक प्राथमिक आरोग्य केंद्रात येत नाही अश्या लोकांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना या विषाणूची माहिती देण्यात यावी हा आजार कसा पसरतो त्याची काय काय लक्षणे असतात या विषयी जन जागृती होने आवयशक आहे ,

Unlimited Reseller Hosting