Home बुलडाणा अखेर संत चोखामेळा जन्मस्थळाच्या विकासासाठी मिळाला साडेचार कोटींचा विकास निधी!

अखेर संत चोखामेळा जन्मस्थळाच्या विकासासाठी मिळाला साडेचार कोटींचा विकास निधी!

76
0

डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या पाठपुराव्याला यश…
प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव
देऊळगावराजा :- संत चोखामेळा जन्मस्थळ मेहुणाराजा विकास आराखडयासाठी मागीलकाळात तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले ०५ कोटी रु. मंजूर झाले होते. सदर विकासनिधी मिळावा यासाठी तत्कालीन आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र केवळ ५५ लाख रुपयांचा विकास निधी मिळाला. त्या पैकी अप्राप्त ४.४५ कोटी रु. मिळावे यासाठी मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री मा.ना.धनंजय मुंडे यांच्याकडे ना.डॉ.राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली असता लवकरात लवकर उर्वरित ४.४५ कोटी निधी देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी सदरहू वास्तूमध्ये लागणाऱ्या फर्निचरसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्यात यावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या होत्या. संत चोखमेळा जन्मस्थळाचा विकासकामाचा प्रस्ताव होता. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बंडोले यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती अगोदर “पाच कोटीचा विकासनिधी” या लेखाशीर्षखाली जाहिर केला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या स्थळाचा सरकार विकास करणार असल्याने एक उपेक्षित जन्मस्थळ अपेक्षित ठिकाणी यावे यासाठी तत्कालीन आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत १५ जानेवारी २०१८ या प्रस्तावाला मान्यता मिळवली. त्यानंतर यापैकी ५० लक्ष रुपये मंजूर होऊन विकास निधी खर्च देखील करण्यात आला.
उर्वरित विकासनिधी मिळावा यासाठी डॉ.शशिकांत खेडेकर यांनी खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ.संजय रायमूलकर, संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली व विकासनिधी लवकरात लवकर द्यावा अशी मागणी केली होती. १२ मार्च रोजी ४ कोटी ६२ लक्ष रुपयांच्या विकासकांमासाठी प्रशसकीय मान्यता मिळाली असून यामध्ये जन्मस्थळाचे सुशोभीकरण, भक्तनिवास, पालखी मार्ग, संपूर्ण कंपाऊंड वाल, मुख्य प्रवेशद्वार रस्त्याचे काम, वाटर पार्क, नियमितपणे वीज आदी कामे पूर्ण केल्या जाणार असल्याची माहिती डॉ शशिकांत खेडेकर यांनी दिली.