Home कृषि व बाजार बोर्डी,रामापुर येथिल शेतकर्याची संत्रा पिक विम्याचा लाभ देण्याची मागणी

बोर्डी,रामापुर येथिल शेतकर्याची संत्रा पिक विम्याचा लाभ देण्याची मागणी

89
0

देवानंद खिरकर ,

बोर्डी := अकोट तालुक्यातील अकोलखेड मंडळातील अतिवृष्टी व अनियमित पावसाने संत्रा पिकाचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावुन घेतला आहे.व अशातच आता आमच्या अकोलखेड मंडळातील 2019 चा संत्रा पिकाचा मृग बहार पिकाचा विमा रक्कम न मिळाल्याने पुन्हा हवालदील झालेले शेतकरी यांनी अखेर तहसिल कार्यालय अकोट येथे धाव घेवून सर्व शेतकरी यांनी आम्हाला विम्याचा लाभ देण्याची मागणी केली आहे.उमरा व पणज या दोन्ही मंडळांना हेक्टरी 38500 रुपये प्रमाने विम्याचा लाभ मीळाला आहे.व ती रक्कम सुध्दा शेतकर्याच्या खात्यात गेल्या दोन दिवसांन पासुन जमा सुध्दा झाललि आहे.असे असतांना फक्त अकोलखेड मंडळ मधिल शेतकर्यांनाच या विम्याच्या लाभा मधुन का वगळण्यात आलेले आहे.असा सवाल सुध्दा शेतकर्यांनि उपस्थित केला आहे.या संधर्भात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी अकोला व अकोट येथे जिल्हा कृषी अधिकारी अकोला व तालुका कृषी अधिकारी अकोट यांचेकडे पाठपुरावा सुध्दा केला होता. अखेर बहुसंख्य शेतकर्यांनि नायब तहसीलदार राजेश गुरव यांना पुन्हा विम्याचा लाभ मिळणे बाबत निवेदन देवून विमा कंपन्यांनी फक्त अकोलखेड मंडळच का वगळण्यात आले आहे.या बाबत रोष व्यक्त केला आहे.तरी उमरा मंडळ व पणज मंडळला मीळालेला 38500 रुपये हेक्टरी प्रमाणे विम्याचा लाभ अकोलखेड मंडळातील शेतकर्यांना सुध्दा तात्काळ जाहीर करुन सदर रक्कम शेतकर्याच्या खात्यात आठ दिवसात जमा करावी.अन्यथा अकोलखेड मंडळातील सर्व संत्रा उत्पादक शेतकरी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांच्या नेतृत्वात विमा कंपनी समोर तिव्र आंदोलनाचा पवित्र घेतील असा आशयाचे निवेदन दिले आहे.सदर निवेदन देतेवेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप बोचे,अनंता घोरड,वैभव आतकड,दिपक खिरकर,प्रमोद काळणे,सुधिर भिल,प्रल्हाद बुंदे,देवानंद खिरकर,धीरज ढोणे,देवराव मारोटकार,अजय तिवाणे,शुभम गावंडे,यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.