Home बुलडाणा जागतिक महिला दिनानिमित्त रुग्णांना गुलाबपुष्प,

जागतिक महिला दिनानिमित्त रुग्णांना गुलाबपुष्प,

80
0

रवी जाधव
देऊळगावराजा :- बाहुबली बहुउद्देशीय संस्था यांच्या मार्फत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या वतीने देऊळगावराजा शहरातील खाजगी व सरकारी रुग्णालयातील सर्व रुग्णांना गुलाबपुष्प देऊन त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांना बिस्किटे व फळांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका सौ.पल्लवी मल्हार वाजपे, बाहुबली बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा. सौ.मनीषा महेंद्र खुळे, डॉ.संजय नागरे, डॉ.नयना नागरे, सौ.सुरेखा दीडहाते व कु.सानिका महेंद्र खुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाहुबली बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शहरातील ग्रामीण रुग्णालय मातोश्री हॉस्पिटल, नागरे हॉस्पिटल, शिंदे हॉस्पिटल, आई हॉस्पिटल, कायंदे हॉस्पिटल, साई हॉस्पिटल, जाधव हॉस्पिटल, कुलस्वामिनी हॉस्पिटल या ठिकाणी गुलाबपुष्प, बिस्किटे व फळांचे वाटप करण्यात आले. सर्व हॉस्पिटलच्या डॉक्टर नर्स व कर्मचारी वृंदानी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना फळवाटपाच्या कार्यक्रमात सहकार्य केले. यामध्ये विशेष करून मातोश्री हॉस्पिटलचे संचालक डॉ.संजय नागरे व डॉ.नयना नागरे या दाम्पत्यानी पुढाकार घेऊन रुग्णांना फळवाटपामध्ये मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाहुबली बहुद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच संबंधित हॉस्पिटलच्या डॉक्टर्स, नर्स व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.