Home जळगाव बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने NRC NPR बॉयकॉट

बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने NRC NPR बॉयकॉट

166

रावेर – शरीफ शेख

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने NRC NPR बॉयकॉट व OBC ची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी यासाठी तालुका स्तरीय रॅलीचे आयोजन करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की , मुक्ताईनगर येथील परिवर्तन चौक पासून सकाळी ११:०० वाजेला रॅलीला सुरूवात करण्यात आली. रॅली मधे SC, ST, OBC , मुस्लिम व सर्व बहुजन समाज बांधव सहभागी होते. देशातील मूलभूत समस्या बाजूला सारून देशात अराजकता पसरवणे तसेच जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा साळसूद डाव सरकार साधत असल्याची घणाघाती टीका यावेळी करण्यात आली. रॅलीत साधारण पाचशेच्या वर जनसमुदाय सहभागी होता.मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. या कार्यक्रमाच्या ठिकाणी गावातील विविध वृत्तपत्र प्रतिनिधी व पत्रकार बांधव देखील उपस्थित होते.
रॅलीचे नेतृत्व बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक प्रमोद सौंदडे यांनी केले.
याप्रसंगी मुक्ती मोर्चाचे नितीन गाडे , शेख असगर शेख अकबर,अफसर खान,
मनियर बिरादरी चे हकीम चौधरी,डी डी गवई,फिरोज खान,वाहाब खान,जलराम इंगळे,
ह्या मान्यवरांनी उपस्थिती जनसमुदायास मार्गदर्शन केले. या वेळी कैलास पाटील,किशोर धायडे,नितीन तायडे,सिध्दार्थ भाऊ,राजू वानखेडे,सिध्दार्थ वाघ,पारास हिरोडे,अरुण जाधव,नितीन सावडे,निशांत झाल्टे,योगेश हिरोडे,नीलेश वानखडे,सुमीत हिरोडे,संगीता सोनवणे,मीरा बाई तायडे,पण्च्षिला बाई बोदडे,निर्मला बाई सपकाडे,शेला चव्हाण,संगीता बोदडे,रेखा फुलपगारे,दमयती सोनवणे,शुशीला इंगळे,उज्वल इंगळे,कोमल तायडे,आदी पदाधिकारी , कार्यकर्ते व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.