Home विदर्भ सावकार ग्रस्त शेतकरी समिती ,महाराष्ट्र च्या वतीने सहकार मंत्री यांना दिले निवेदन

सावकार ग्रस्त शेतकरी समिती ,महाराष्ट्र च्या वतीने सहकार मंत्री यांना दिले निवेदन

228

देवानंद खिरकर

बोर्ड़ी / अकोट , दि. ०१ :- सावकार ग्रस्त शेतकरी समिती,महाराष्ट्र यांनी निवेदनाद्वारे,सततची नापिकी ,दुष्काळी परिस्थिती,अतिवृष्टी,ओला दुष्काळ,बैंकेच्या कर्जाची परतफेड,सावकारी कर्ज याच्यामुळे विदर्भातील शेतकर्याच्या आत्महत्याचा आलेख सतत वाढतच आहे.विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सावकार ग्रस्त शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खालील महत्वाच्या मागण्यासाठी दि.04/03/2020 रोजी आझाद मैदान ,मुंबई येथे सावकार ग्रस्त शेतकरी समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
,,मागण्या,,
(1) ज्या ज्या अवैध सावकाराने सावकार ग्रस्त शेतकर्याच्या जमिन हडप करुन स्वताच्या नावे 7/12 केला. परंतू त्या जमिनिचा ताबा सावकार ग्रस्त शेतकर्या कडे आहे .अशा जमिनी सरकारच्या नावे करण्यात येऊन पिक नुकसानीची अनुदान सावकाराला न देता ते जमीन ताब्यात असलेल्या शेतकर्यांना देण्यात यावे.
(2) महाराष्ट्रा सावकारी अधिनियम ( नियमन ) 2014 च्या कायद्यानुसार ज्या ज्या सावकार ग्रस्त शेतकर्याकडुन ए.आर. डी. डी. आर यांचे कडुन निकाल लागला.परंतू सावकारांनि उच्च न्यायालयात अपिल दाखल केले व सावकारी पाशात हडप केलेल्या शेतजमीनीच्या पिकांचा पैसा न्यायालयात लावून हवालदिल सावकार ग्रस्त शेतकरी पैशा अभावी मस्तवाल सावकाराशी टक्कर घेऊ शकत नाही अशा सावकार ग्रस्त शेतकर्याच्या पाठीशी शासनाने स्वताचा वकील उभा करावा .
(3) सावकारी कायद्याची कालमर्यादा वाढवावी.त्या कालमर्यादा बाहेरील न बसलेली प्रकरणे विशेस बाब म्हणून डि. डि.आर, व ए.आर,यांना तसे हक्क प्रदान करुन चालविण्याचे आदेश व्हावेत.
(4) डि डि आर व ए आर कडे प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत.सावकाराला पाठीशी घालणार्या डि.डि.आर,व ए.आर वर कडक कारवाई करण्यात यावी.
(5) प्रत्येक जिल्ह्यातून सावकार ग्रस्त शेतकरी समितीचा प्रतिनिधि शासनाच्या दक्षता समितीत ,अशासकीय सदस्य,म्हणून घेण्यात यावा.
(6) ज्या ज्या सावकार ग्रस्त शेतकर्यांना डि.डि.आर व ए.आर यांनी,सावकारी कर्ज मुक्तता प्रमाणपत्र,दिले त्यांना त्यांच्या जमिनिचा प्रत्यक्ष ताबा व 7/12 त्यांच्या नावावर करण्यात यावा.
(7) सावकारी अधिनियम कायद्यान्वये सुधारणा करुन त्याची त्वरित अमलबजावणी करणे.
सावकार ग्रस्त शेतकर्याच्या जिवन मरणाच्या अत्यंत महत्त्वाच्या मागण्यासाठी दि.4/3/2020 रोजी आझाद मैदान ,मुंबई येथे सावकार ग्रस्त शेतकरी समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
आपण राज्याचे सहकार मंत्री या नात्याने सावकार ग्रस्त शेतकर्याच्या प्रश्नाची जाण असलेले शेतकरी नेते असल्यामुळे आपण गांभिर्यपुर्वक लक्ष घालुन सावकार ग्रस्त शेतकर्याच्या मागण्याची पूर्तता कराल करिता निवेदन सादर केले आहे.त्याच्या प्रतिलीपी (1) मा.ना.श्री.विश्वजीत कदम ,सहकार राज्यमंत्री म.रा.मंत्रालय मुंबई.
(2) मा.मुख्य सचिव,सहकार विभाग ,म.रा.मंत्रालय मुंबई.
(3) मा.ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडु पालकमंत्री अकोला.यांना देण्यात आल्या आहे.
सदर निवेदन नेताजी अरुण जाधव संस्थापक अध्यक्ष,रमेश रामचंद्र खिरकर प्रदेश अध्यक्ष,सौ.अनिता खुशालसराव ढगे महिला आघाडी अध्यक्षा सुनिता अशोक ताथोड़,भीमराव सुखदेव भदे,देवकृष्ण जगदेव महल्ले,सूगदेव चिनकूबा मुरकूटे,रवि पांडूरंग ठाकरे यांच्या सह्या आहेत.