Home रायगड कर्जतमध्ये भाजपच्या वतीने धरणे आंदोलन, विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर

कर्जतमध्ये भाजपच्या वतीने धरणे आंदोलन, विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर

111
0

कर्जत – जयेश जाधव

कर्जत तालुक्यातील रिलायन्स गॅस पाइपलाइनच्या भुमिअधिग्रहन प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळाले पाहिजे, तसेच राजनाला दुरुस्तीवर प्रचंड खर्च होऊनही शेतकऱ्यांना पाणी नाही.यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशा मागणी साठी कर्जत तालुका भाजपच्या वतीने कर्जत शहरातील टिळक चौकात आज सकाळी १० वाजता धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.त्यानंतर या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

याप्रसंगी भाजप कर्जत तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव भोईर, जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे,कर्जत सरचिटणीस पंकज पाटील, राजेश भगत, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक बळवंत घुमरे, किरण ठाकरे, प्रकाश ठाकरे, प्रमोद पाटील, नगरसेविका स्वामिनी मांजरे,विशाखा जिनघारे,स्नेहा पिंगळे, प्रशांत उगळे, ऋषिकेश जोशी,बंधू पाटील, मृणाल खेडकर,नम्रता कांदळगांवकर, समिधा टिल्लू,शर्वरी कांबळे,नीता कवाडकर नितीन कांदळगांवकर राहुल कुलकर्णी,बल्लाल ‌जोशी, मंदार मेहंदळे,विजय जिनघरे, रमाकांत जाधव आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.