नांदेड , दि.२५ : ( राजेश भांगे ) – नायगांव ( बा. ) तालुका घुंगराळा येथे पोलीस खात्याचे बिनतारी संदेश पुनप्रेक्षपन केंद्र (Wireless Centre )हे कार्यालय गेल्या चाळीस वर्षांपासून कार्यरत आहे.या कार्यालयाची इमारत घुंगराळा येथील माळरानावर असुन ही ईमारत खुप जीर्ण व जुनी झाली आहे. या ईमारतिचे छत गळत असुन भिंतिंना तडे गेले आहेत,व दरवाजे,खिडक्या मोडून पडले असुन ही इमारत धोकादायक झाली असुन या कार्यालत काम करनार्या करमाचार्यांचा जीव धोक्यात आला आहे.
त्यामूळे या ठिकानी नविन व सुसज्ज इमारत बांधावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी गृहमंत्री मा.ना.अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. यावर अनिल देशमुख यांनी लवकरच नविन ईमारतिसाठी निधी उपलब्ध करून व स्थानीक प्रशासनास आदेश देऊ असे सांगितले.
Home मराठवाडा घुंगराळा येथील बिनतारी संदेश प्रेक्षपन केंद्र कार्यालयाच्या नविन इमारत बांधकाम मंजुरीची केली...