Home मराठवाडा हर्सुल मध्यवर्ती कारागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

हर्सुल मध्यवर्ती कारागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

189

अब्दुल कय्युम

औरंंगाबाद , दि. १९ :- हर्सुल मध्यवर्ती कारागृहात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी हर्सुल कारागृहातील बंद्यासह कारागृहाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हर्सुल मध्यवर्ती कारागृहात कारागृहाचे अधिक्षक हिरालाल जाधव यांच्या पुढाकाराने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कारागृहाचे अधिक्षक जाधव यांनी उपस्थित बंद्यांना शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याविषयीची माहिती दिली. तसेच कारागृहातून सुटका झाल्यावर तयांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी कारागृहाचे अधिक्षक जाधव यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ तुरुंगाधिकारी राजेंद्र मरळे,चंद्रकिरण तायडे,मनोहर भोसले,एस.जी.गिते,शिक्षक कडुबा पुरण पचलोरे,सुभेदार सिध्दविनाय येलगिरे यांच्यासह कारागृहातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.