Home महत्वाची बातमी दादासाहेब फाळके यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्कार मिळावा यासाठी चित्रपट व्यवसायातील संघटना आग्रही

दादासाहेब फाळके यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्कार मिळावा यासाठी चित्रपट व्यवसायातील संघटना आग्रही

165

प्रतिनिधी – लियाकत शाह

मुंबई , दि. १८ :- ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन,वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोड्युसर असोसिएशन, ऑल इंडिया मिडिया एम्प्लॉईज असोसिएशन आयमा,भारत सिने रायटर्स असोसिएशन या संघटनांनी दादासाहेब फाळके यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी आग्रही मागणी आज त्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून करण्यात आली. भारतीय चित्रपटसुष्टीचे जनक स्वर्गीय दादासाहेब फाळके यांचे ७६वे पुण्यस्मरण गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक महामंडळाच्या वतीने श्री मंगेश राऊळ यांनी आयोजीत करण्यात आले होते. या प्रसंगी दादासाहेब फाळके यांचे नातू श्री चंद्रशेखर पुसाळकर सपत्नीक हजर होते. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष गोरक्ष धोत्रे यांनी दादासाहेब फाळके यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात यावी यासाठी सह्यांचे ‘अनुमोदन मोहीम’ राबविण्याचे सूतोवाच केले. यावेळी उपस्थित सर्व चित्रपट व्यवसायातील संघटनांनी आणि त्याच्या पदाधिकाऱ्यांनी या मोहिमेचे स्वागत करून सहभागी होण्याचे ठरविले आहे. “२६ मे २०१९ रोजी ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेले भारत भेटीवर आले असता त्यांना ऑल इंडिया सिने आणि मीडिया असोसिएशन कडून दादासाहेब फाळके यांची भव्य प्रतिमा भेट देण्यात आली होती त्यावेळी समारंभाच्या समारोपानंतर आयोजक ऑस्कर जे जुरी श्री उज्ज्वल निरगुडकर यांना दादासाहेब यांची ती प्रतिमा न विसरता माझ्या हॉटेलवर पोहच करा असे कळविले होते. ते म्हणाले होते की माझ्या ऑफिसात जगभरातील चित्रपट व्यवसायाची प्रतीके आहेत फक्त दादासाहेबांच्या प्रतिमेची उणीव होती ती आज भरून निघाली” या प्रसंगाची आठवण सिने वर्कर्सचे अध्यक्ष गोरक्ष धोत्रे यांनी आपल्या भाषणात आवर्जून सांगितली. दादासाहेबांची महनीयता आणि कुतूहल आजही देशाबाहेर तितकीच आहे असेही ते पुढे म्हणाले. ऑल इंडिया मिडिया एम्प्लॉईज असोसिएशनआयमा चे सरचिटणीस अजय घाटे, सिनेवर्कर्सचे सरचिटणीस संतोष बनसोडे, वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोड्युसर असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य चंद्रशेखर वर्मा, तारक मेहता मालिकेचे निर्मिती प्रमुख विनोद शिशुपाल,भारत सिने रायटर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र अरोरा, अभिनेत्री-मॉडेल केतकी वळसे पाटील, निर्माती अनिता नाईक, पत्रकार-निर्माते पंकज अपूर्वा, सिनेतारका सोमेश्वरी पाटील यांनी तसेच कलरस वाहिनी वरील शक्ती सिरीयल चे कलाकार यांनी दादासाहेबांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. सिने कामगार संघटनांचे पदाधिकारी राज पटेल,संतोष गायकवाड, विक्की सपकाळे, नागनाथ चौगुले व चित्रपटसृष्टीला कलाकार, तंत्रज्ञ,कामगारवर्ग आदी मान्यवर हजर होते.
दादासाहेब फाळके चित्रनगरीचे जनसंपर्क अधिकारी मंगेश राऊळ, शेळके मैंडंम, शर्मा व अशोक जाधव यांनी फिल्मसिटीच्या वतीनेसमारोपाच्या भाषण करून सर्व मान्यवरांचे आभार मानले.