Home बुलडाणा शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या माय लेकीचे विहिरीत बुडून दुर्देवी मृत्यू

शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या माय लेकीचे विहिरीत बुडून दुर्देवी मृत्यू

251

अमीन शाह

बुलडाणा , दि. १३ :- पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या मायलेकीचे विहिरीत बुडून मृत्यू झाल्यानंतर पाण्यावर तरंगतांंना प्रेत आढळून आल्याची घटना आज गुरुवार दि.१३ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ४.३० वाजे दरम्यान मोसंबेवाडी तालुका मेहकर येथे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली असून आहे.

याबाबत सविस्तर असे की येथून जवळच असलेल्या मोसंबे वाडी ता.मेहकर येथील संतोष सखाराम मोसंबे यांचे गावा पासूनच अंदाजे २ कि.मी. अंतरावर शेती असून शेतात पेरलेल्या हरबऱ्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी पत्नी सौ उषा संतोष मोसंबे वय 40 वर्ष व मुलगी कु. संजना संतोष मोसंबे वय 19 वर्ष राहणार मोसंबे वाडी ता. मेहकर हे मायलेकी सकाळपासून हरबरा पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या होत्या तर गावातील भाऊबंदकीत पाहूणकी असल्याने पाहूणकि साठी संतोष सखाराम मोसंबे हे गोरेगाव ता. सिंदखेड राजा येथे भाऊबंदा सोबत गेलेले होते. येथून सायंकाळी ४.३० वाजेदरम्यान गावी परत आल्यानंतर शेतात गेले असता त्यांना शेतात पत्नी व मुलगी दिसून आले नाही त्यामुळे त्यांनी विहिरीजवळ पोहोचून विहिरीतील पाणी पाहत असतांंना त्यांना आपली पत्नी सौ.उषा संतोष मोसंबे व मुलगी कु. संजना संतोष मोसंबे यांचे प्रेत पाण्यावर तरंगतांंना आढळून आले त्यामुळे त्यांनी रडतच मोबाईल वरून गावात आपल्या भावांना माहिती कळविली त्यामुळे गावातील सर्वांनीच त्यांच्या शेताकडे धाव घेतली. पोलिसांना माहिती कळविण्यात आल्यानंतर ठाणेदार दिलीप मसराम,स.पो.नि.काकडे,रायटर शरद बाठे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन लाकडी बाज विहिरीत टाकून त्याच्या साह्याने दोघींचे प्रेत विहिरी बाहेर काढले व पंचनामा केला.
सदर प्रकरणी फिर्यादी गणेश रामराव मोसंबे यांच्या फिर्यादीवरून मर्ग नं.०३ कलम १७४ जा.फौ.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील अधिक तपास ठाणेदार दिलीप मसराम यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.काकडे व त्यांचे सहकारी करीत आहेत. वृत्त लिहीपर्यंत घटनेमागील कारण मात्र कळू शकलेले नाही. घडलेल्या घटने मूळे गावात हळहळ वयकत केली जात आहे .