कोरपना प्रतिनिधी – मनोज गोरे
संघर्ष ग्रुप, स्टुडन्ट फोरम ग्रुप कोरपना यांच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख अतुल आसेकर, समाजसेवक दिनेश राठोड व ग्रुप चे सदस्य यांच्या नेतृत्वा मध्ये दि. 3/2/2020रोजी झालेल्या हिंगणघाट जळीत कांडातील आरोपीला फास्ट ट्रक कोर्टात खटला चालयुन त्याला फाशीची शिक्षा देण्या बाबत बस स्टॉप कोरपना येथून तहसील कार्यलय कोरपना इथपर्यंत निषेध मोर्चा रॅली काढण्यात आली.
रॅली मध्ये स्व. भाऊराव पा. चटप आश्रम शाळा कोरपना, वसंतराव नाईक विधालय कोरपना, कला महाविद्यालय कोरपना, येथील विध्यार्थी व शिक्षक यांचा सहभाग मोर्चा रॅली मध्ये होता. तहसीलदार कोरपना यांना हिंगणघाट येथील प्राध्यापक तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी जळीत कांडातील आरोपी यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.