Home मराठवाडा महिलेवर सामुहिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी अटक

महिलेवर सामुहिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी अटक

142

लक्ष्मीकांत राऊत

जालना , दि. १२ :- महिलेला दारू पाजून तिघांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना परतूर मध्ये दि. १ ऑगस्ट २०१९ उघडकीस आली आहे. पिडीत महिलेले पोलीस स्टेशन मध्ये येऊन समक्ष फिर्याद दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तिन आरोपींविरुद्ध परतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या सहा महिन्यापासून फरार असलेल्या आरोपींना पोलिसांनी शोध घेऊन वाशी मुंबई येथून रात्री सतीश कारके, विकास उर्फ विक्की हिवाळे या दोघांना अटक केली आहे. एक आरोपी फरार आहे. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.एल. पवार यांनी बोलताना दिली.

आरोपी गेल्या सहा महिन्या पासून पोलिसांना ठिकाणे बदलून हुलकावणी देत होते. मात्र पोलिसांनी आरोपीचे लोकेशन घेत वाशी (मुंबई) येथे झोपडपट्टी परिसरात आरोपी असल्याची माहिती मिळाली आरोपींची माहिती काढून पोलिसांनी आरोपी राहत्या ठिकाणी तसेच एक आरोपी व्यायाम करण्यासाठी जिममध्ये गेला असता जिमच्या भोवताली सापळा रचून जिम मधून बाहेर येताच त्यांच्यावर झडप मारून एकाला ताब्यात घेतले तर एकाला कामाच्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. हि कारवाई उपविभागीय अधिकारी सोपान बांगर, पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव, पो.कॉ. नितीन कोकणे, राजू काळे, जालना सायबर क्राईमचे सागर बाविस्कर यांनी केली.

या घटने बाबत अधिक माहिती अशी की, जालना तालुक्यातील २९ वर्षीय महिला एक वर्षा पूर्वी परतूर येथील आपल्या मैत्रिणीकडे आठ दिवसा करिता राहण्यासाठी आली होती. दरम्यानच्या आठ दिवसाच्या कालावधीत आरोपी सतीष कारके याच्या सोबत या महिलेचे प्रेम संबध जुळले. नंतरच्या काळात आपल्या गावी परत गेल्यानंतर ही दोघांमध्ये रोज फोनवर बोलणे स्रुरू होते. सतीश कारकेने सदरील महिलेला आपल्या पतीला सोडून माझ्या सोबत राहा असा हट्ट धरला होता. शिवाय तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देखील दिले होते. यावर सदरील महिलेले आपल्याला तीन मुली असल्याचे सांगत, त्यांचा सांभाळ केला तरच मी तुझ्या सोबत येऊ शकते अशी अट घातली होती. याला सतीशने होकार दिल्यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये ही महिला आपल्या पतीची नजर चुकवून आपल्या तिन्ही मुलींना घेऊन सतीश सोबत परतूर येथे पळून आली. येथील शनी मंदिर परिसरात भाड्याच्या घरात ती मुलीसोबत राहत होती. दरम्यानच्या काळात सतीशने तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबध प्रस्थापित केले असल्याचे पिडीतेने फिर्यादीत म्हटले आहे.

दोन महिन्यापूर्वी सतीशच्या सांगण्यावरून त्याचा मित्र विकी आपल्या सोबत एका मुलीला घेऊन सदरील महिलेच्या शनी मंदिर भागातील भाड्याच्या रूमवर गेला. आठ दिवसासाठी या मुलीला तुझ्याकडे राहू दे अशी विनंती सतीशच्या सांगण्यावरून विकीने केली. मुलीला सोबत ठेवण्यास नकार दिल्यानंतर सतीशने तिच्याशी भांडण केले, त्यानंतर तिला भेटण्यास, तिच्याकडे जाण्यास टाळाटाळ करू लागला. नंतरच्या काळात पीडिता शनिमंदिर भागातील रूम सोडून, आष्टी रोडवरील ज्ञानेश्वर नगरात नवीन रूम किरायाने घेतली. आपल्या तिन्ही मुलींसोबत ती राहू लागली.

२७ जुलै २०१९ च्या रात्री आकरा वाजेच्या सुमारास पीडिता रूम मध्ये झोपली असतांना आरोपी सतीश कारके व त्याचा मित्र विकी आणि विकीचा दाजी असे तिघेजन रुममध्ये शिरले. झोपेतून उठवून सतीश कारके तिला म्हणाला, झाले गेले सोडून दे, यापुढे आपण गोड राहू. नंतर तिघांनी आपल्या सोबत दारू आणली होती, तिघे सोबत दारू प्यायले आणि पिडीत महिलेला देखील बळजबरीने पाजली. दारूच्या नशेत सतीश तिच्याशी लगट करू लागला, सोबत असलेल्या इतर दोघांची लज्जा येत असल्याने तिने सतीश सोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. तिच्या नकाराला दाद न देता सुरुवातीला सतीशने आणि त्या नंतर विकीच्या दाजीने बळजबरीने शारीरिक संबध केले. त्यानंतर पुन्हा सतीशने तिला दारू पाजली. या मुळे तिला उलट्या होऊ लागल्या, दारूच्या नशेत तिला झोप लागून गेली. सकाळी उठल्यानंतर तिच्या अंगावर कपडे नव्हते. सतीशला फोन वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद येत होता. परतूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तिने त्याचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही. अखेरीस कंटाळून पिडीतेने वरील तिन्ही आरोपींविरुद्ध परतूर पोलिसात फिर्याद दिली. कलम ३७६, ३७६ ड, ३२८, ४५२ कलमान्वये दि. १ ऑगस्ट २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Previous articleTwo national award winners come together for Bhoot
Next articleएक शाम शाहीन बाग के नाम
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.