Home बुलडाणा पोलीस हेड कॉन्स्टेबलची विहरित उड़ी मारून आत्महत्या ,

पोलीस हेड कॉन्स्टेबलची विहरित उड़ी मारून आत्महत्या ,

561

 

अमिन शाह

साखरखेर्डा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिवरा आश्रम येथील रहिवासी पोलीस हेड कॉन्स्टेबल पंजाबराव शेळके वय 56 यांनी आज मेहकर तालुक्यातील बाभुळखेड शेत शिवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज ८ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल पंजाबराव भीमराव शेळके यांनी बाभुळखेड शिवारातील लाड कुटुंबाच्या विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृताच्या कुटुंबात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घड़लेल्या घटने मुळे पोलिस दलात दुःख व्यक्त केले जात आहे ,