Home बुलडाणा किनगावराजा जिल्हा परिषद केंद्र शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

किनगावराजा जिल्हा परिषद केंद्र शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

89

 

किनगाव राजा प्रतिनिधी इसाक कुरेशी

किनगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेत छत्रपती आज 19 फेब्रुवारी गुरुवार रोजी शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास शाळा समितीचे अध्यक्ष इसाक कुरेशी , उपाध्यक्ष राजश्री विशाल राजे जाधव व सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान कृषी उपसंचालक रोहित गवई यांचा जिल्हा परिषद शाळेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
जीवन विकास विद्यालयाचे शिक्षक ज्ञानेश्वर राजू जाधव यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम, स्वराज्य स्थापनेचे महान कार्य आणि न्यायप्रिय व सर्वसमावेशक नेतृत्वाची माहिती दिली. शिवाजी महाराज हे सर्व समाजघटकांना सोबत घेऊन चालणारे आदर्श नेतृत्व होते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी जिजाबाई व शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान केली होती. लहान मुलांनी प्रभावी भाषणे, पोवाडे आणि नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी मुख्याध्यापक शिवकुमार वाघ, केंद्र प्रमुख गैबी नंद घुगे, शिक्षक अनंता माथने, शिक्षिका संगीता काकड, मीरा पवार, वर्षाताई शेळके, अनिता खरात काकडे तसेच पालक रवी जाधव, राहुल पालवे, बाळू वायाळ, विजू चतुर व इतर सर्व पालकवर्ग व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.