
यूसुफ शेख/संग्रामपुर
शासनाने बंदी घातलेला मानवा सह पशु जनावरांच्या जीवितास घातक ठरणार चायनीज मांजा असलेले अल्पवयीन मुले सर्रास वापर करीत आहे याकडे पालकांनी आपल्या पाल्यांना चायना माजाचा वापर न करण्यास समज देणे गरजे आहे चायना माजामुळे गरिब मिस्त्रीला शरिरावर ईजा सह आर्थिक भुदंड सहन करावा लागला तालुक्यातील पलसीपुरा संग्रामपुर येथील रहिवासी शेख अनिस शेख गफ्फार मिस्त्री दानापुर येथुन काम आटपुन संग्रामपुर गावाकडे दुचाकीने वडगाव वाण येथुन जातांना मुख्य रसत्यावर काळ्या कलरचा चायना माज्याने गळा चिरून गंभीर जखमी झाल्याची घटना दि १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दरम्यान घडली सोनाळा पोलीसांनी दोन चायना मांजा विक्रेत्या अलीकडेच कारवाई केली परंतु पतंग उडविणाऱ्या अल्पवयीन मुले चायना मांजाचा सर्रास वापर करित असल्याने सदर घटने वरुन सिद्ध होत आहे याबाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि पलसीपुरा संग्रामपुर येथील रहिवासी शेख अनिस शेख गफ्फार मिस्त्री दानापुर येथुन काम आटपुन संग्रामपुर गावाकडे दुचाकीने वडगाव वाण येथुन जातांना मुख्य रसत्यावर काळ्या कलरचा चायना माज्याने गळा चिरून गंभीर जखमी त्यांच्या सहकार्याने गंभीर अवस्थेत गळ्याला रुमाल बांधुन ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे आनल्या नंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर अवस्थेत शेख अनिस मिस्त्री यांना त्यांच्या नातेवाईकांनी शासकिय रुग्णालय अकोला येथे हलविले असता शेख अनिस मिस्त्री यांच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आतुन व बाहेरुन १८ टाके लागले असल्याची माहिती संबंधीत रुग्णावर उपचार करणाऱ्या वैधकिय सुत्रांनी दिली सोनाळा पोलीसांनी शासनाने बंदी घातलेला मानवा सह पशु जनावरांच्या जीवितास घातक ठरणार चायनीज मांजा साठवून ठेवणाऱ्या दोघां विरुध्द पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत सोनाळा पोलीसांनी कारवाई केली मात्र पतंग उडवितांना मानव व पशु जनावरांसाठी घातक असलेला शासनाने बंदि घातलेल्या चॉयना मांजाचा वापर करणाऱ्या विरुद्ध कारवाई होणे गरजेचे आहे अशी मांगणी सदर घटनेमुळे जोर धरत आहे











































