
चोरी गेलेला एक्सप्लोसिव्ह डेटोनेटर किंमत 1,69,488/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत;चार आरोपी गजाआड
वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
फुलचंद भगत
वाशिम:-वाशिम जिल्ह्यातील पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण हद्दीत दिनांक १९/०९/२०२५ रोजी फिर्यादी नामे बलराम राजु चौधरी रा वाशिम यांचे सावरगांव बर्डे येथील परवानाधारकाचे मँक्झीनमध्ये चोरी होवुन त्यामध्ये विहीर खोदण्या करीता वापरण्यात येणारे डेटोनेटर चोरी गेले होते. त्यावरुन पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे अप क्र २८५/२५ कलम ३०५ (अ), ३३४ भा. न्या. सं. चा दाखल झाला होता. सदर डेटोनेटरचा वापर देशविघातक कृत्यामध्ये होवु शकतो म्हणुन सुरुवातीपासुन या गुन्ह्यात वरिष्ठांनी जातीने लक्ष पुरविले होते व वेळोवेळी हा गुन्हा उघड होण्याकरीता मार्गदर्शन व पाठपुरावा ठेवला होता. सदर गुन्ह्याचा समातंर तपास करीता स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांना सदर गुन्ह्यातील माल हा सावरगांव बर्डे येथील एका शेतात लपवुन ठेवला आहे. अशी खात्रीलायक गोपणीय माहिती मिळाल्या वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी त्वरीत एक टिम तयार करुन सावरगांव जिरे परीसरात रवाना केली. सावरगांव जिरे शेत शिवारात सुनिल सुरेश कंकाळ रा सावरगांव बर्डे यांचे शेताची पाहणी केली असता त्यांचे शेतात ठेवलेल्या सोयाबिन कुटाराच्या गंजी मध्ये लपवुन ठेवलेले ०७ नायलोनचे कट्टे पंचासमक्ष काढुन दिले त्यामध्ये एक्सप्लोसिव्ह डेटोनेटर ४०७६ नग किंमत १,६९,४८८ /- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो पंचासमक्ष हस्तगत करण्यात आला. तसेच सदर गुन्ह्यात आरोपी नामे ०१) सुनिल सुरेश कंकाळ ०२) अमोल पांडुरंग बर्डे ०३) दशरथ पांडुरंग बर्डे ०४) गोविंदा उर्फ राजेश सोपान कड सर्व रा सावरगांव बर्डे यांना अटक करण्यात आली असुन गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड मँडम, श्री. नवदिप अगरवाल सा. उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि/ योगेश धोत्रे पोहवा / गजानन झगरे, प्रविन शिरसाट, पोना / ज्ञानेश्वर मात्रे, पोअंम / अमोल इरतकर, संदिप दुतोंडे, संतोष वाघ, चापोशी/ स्पनिल तुळजापुरे स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी अथक परीश्रम घेतले आहे. सदर आरोपीतांवर अधीक कठोर शिक्षा होणे करीता गुन्ह्यातील पुरावे हस्तगत करणेचे प्रयत्न सुरु आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि राहुल गंधे पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण हे करीत आहेत.











































