Home वाशिम पोलीसाच्या कस्टडीतून पलायन करणारा अट्टल गुन्हेगारास तेलंगणा येथून अटक

पोलीसाच्या कस्टडीतून पलायन करणारा अट्टल गुन्हेगारास तेलंगणा येथून अटक

101

 

स्थानिक गुन्हे शाखा वाशिमची कौतुकास्पद कामगीरी

फुलचंद भगत
वाशिम:-पोलीस स्टेशन शिरपूर येथील अपराध क्रमांक 185/2025 या जबरी चोरीच्या गुन्ह्यात सराईत आरोपी गोपाल विजय पवार (रा. पांगरखेड, ता. मालेगाव, जि. वाशिम) यास अटक करून मा. न्यायालयात हजर करण्यात आले होते. मा. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कस्टडी मंजूर केली होती.त्या दरम्यान रात्री आरोपीने पोलिस अमलदारांच्या हाताला झटका देत शिरपूर पोलीस ठाण्यातून पलायन केले. या पलायनाबाबत शिरपूर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 466/2025, कलम 262 BNS प्रमाणे स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी कोणताही मोबाईल किंवा डिजिटल साधन वापरत नसल्याने त्याचा शोध घेणे अत्यंत कठीण झाले. आरोपीच्या गावातूनसुद्धा कोणतीही माहिती प्राप्त होत नव्हती.
दरम्यान गोपनीय सूत्रांवरून आरोपी हा उटनूर, जि. आदिलाबाद (तेलंगणा) येथे येत असल्याबाबत गोपनिय माहिती मिळाली वरुन सदर आरोपीस अटक करणे करीता स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम येथील विशेष पथक तयार करुन त्वरीत तेलंगणा राज्यात रवाना करण्यात आले. विशेष पथक दि. 26/11/2025 रोजी उटनूर येथे दाखल झाले. आरोपी हा दिनांक 27/11/2025 रोजी रात्री दरम्यान येत असल्याची खात्री झाल्याने पथकाने कारवाईची संपूर्ण योजना रात्रीच आखून ठेवली. आरोपी अत्यंत सावध व चतुर असल्याने पोलिसांनी रणनीतिक व गुप्त पद्धतीने कारवाई करण्याचे ठरविले. दिनांक 27/11/2025 रोजी आरोपीस पकडण्या करीता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी वेशांतर करुन आरोपीवर पाळद ठेवली. आरोपी हा आला असल्याचे दिसताक्षणी वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने आरोपीवर छापा टाकुन आरोपीला ताब्यात घेतले.आरोपीला तेलंगणातून महाराष्ट्रात आणून शिरपूर पोलीस स्टेशनकडे सुपूर्द करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. इमरान खान पठाण हे करीत आहेत.
प्राथमिक चौकशीत आरोपी इतर ठिकाणीही घरफोडी व जबरी चोरीचे गुन्हे केले असण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्या अनुषंगाने तपासाचा आवाका वाढविण्यात येत आहे.सदर कारवाई अनुज तारे, पोलीस अधीक्षक वाशिम, लता फड, अपर पोलीस अधीक्षक वाशिम, व नवदीप अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली, पो. नि. प्रदीप परदेशी स.पो.नि. जगदीश बांगर, पो. अंमलदार गजानन झगरे, गजानन गोटे, दीपक घुगे, अमोल इरतकर, संदीप दुतोंडे तसेच चालक सुनील तायडे व सायबर सेलचे पोअंम किशोर इंगोले व मपोअंम प्रतिक्षा एकाडे यांनी अथक परिश्रम घेतले.