Home महत्वाची बातमी अखेर ग्रामपंचायत मार्डीचे सदस्य सुरज पंडीले ठरले ‘अपात्र’

अखेर ग्रामपंचायत मार्डीचे सदस्य सुरज पंडीले ठरले ‘अपात्र’

230

अपर जिल्हाधिकारी यांनी पारीत केला आदेश

ग्रामपंचायतीचा कर बुडविणे व इतर प्रकरणे आले अंगलट

यवतमाळ – जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील मार्डी ग्रामपंचायतीला देय असणारा लाखो रुपयांचा मालमत्ता कर सदस्य सुरज पंडीले व त्यांचे वडीलांनी हेतुपुरस्परणे बुडविल्याप्रकरणी तसेच अन्य प्रकरणी चंद्रशेखर मडावी यांनी विद्यमान अप्पर जिल्हाधिकारी, यवतमाळ यांचे न्यायालयात ग्रामपंचायत विवाद अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी विवाद अर्ज मंजुर केल्याने मार्डी ग्रामपंचायतीचे सदस्य सुरज दिवाकर पंडीले यांचे सदस्य पद यांचे आदेशाने अपात्र ठरले आहे.

ग्रामपंचायत मार्डीचे सदस्य सुरज पंडीले व त्यांचे वडीलांनी सन २०१९ मध्ये मौजा मार्डी येथील शेतजमिनीची वाणिज्यीक कामकाजाकरीता तहसिलदार, मारेगाव यांचेकडून अकृषक परवानगी मिळविली होती. परंतु सदरच्या शेतजमिनीची अकृषक मिळवल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य सुरज पंडीले व त्यांचे वडीलांनी हेतुपुरस्परपणे ग्रामपंचायत मार्डीला देय असलेल्या लाखो रुपयाच्या मालमत्ता कराचे नुकसान केल्याने, चंद्रशेखर मडावी यांनी सदस्य सुरज पंडीले यास अपात्र करणेकरीता विवाद अर्ज दाखल केला होता. प्रस्तुत प्रकरणी अपर जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी अर्जदाराने मांडलेले मुद्दे, कायदेशीर तरतुदी, युक्तीवाद घेऊन अर्जदाराचा अर्ज मंजुर केलेला आहे. यामुळे सुरज पंडीले यांचे सदस्य पद अपात्र ठरले आहे.

याप्रकरणी चंद्रशेखर मडावी यांचे बाजुने अ‍ॅड. निखिल सायरे व अ‍ॅड. रंजित अगमे यांनी युक्तीवाद केला होता. प्रस्तुत प्रकरणी त्यांना अ‍ॅड. रवी कुकडे व अ‍ॅड. भावेश श्रीराव यांनी सहकार्य केले होते.