
फुलचंद भगत
वाशिम:-पोलीस स्टेशन रिसोड येथील मोप गावाजवळील लोणार कडे जाणा-या रोड वर एका स्विफ्ट डिझायर कार मधील नांदेड मधील रहीवासी असलेले दवाउपचार करणे कामी पेशंट घेवुन जात असतांना सदर मोप गावा जवळ तिन चारचाकी गाड्यानी सदरची गाडी रस्त्यात अडवुन त्यामधील इसमांना जबर मारहाण करुन त्यांचे जवळी 22,000/- रु जबरीने काढुन घेतल्याची घटना घडली असल्या बाबत माहिती नियंत्रण कक्ष वाशिम येथे मिळाली. वरुन तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा वाशिम व पोलीस स्टेशन रिसोड येथील अधिकारी व पोलीस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. व सदर घटनेच्या अनुशंगाने आजुबाजुच्या जिल्ह्यातील दरोडा टाकणारी टोळी बाबत माहिती घेतली. तसेच गुप्तबातमीदारांना सक्रिय करुन माहिती घेण्यात आली. सदर गुन्ह्याची माहिती घेत असता पोलीसांना माहिती मिळाली की, दिनांक 10/12/2025 रोजी ग्राम आसेगांवपेन जि. वाशिम येथील दिपक सिताराम खानझोडे यांचा विवाह राधा तुपे रा. संभाजी नगर हिचे सोबत आसेगांवपेन येथे झाला होता. सदर मुलीसोबत लग्न लावण्या करीता दिपक खानझोडे याने मध्यस्थाना दोन लाख रुपये दिले. परंतु मुलगी ही लग्न झाल्यावर पळुन जाण्याच्या तयारीत असल्याबाबत दिपक खानझोडे व त्याचे परिवारास समजले त्यामुळे सदर मुलीवर त्यांनी लक्ष ठेवले. दिनांक 13/12/2025 रोजी तिन अज्ञात चारचाकी वाहणामधुन 10 ते 12 लोक ग्राम आसेगांवपेन येथे आले. त्यावेळी दिपक खानझोडे यांच्या घरी मुलगी न दिसल्या मुळे अज्ञात लोकांनी त्याचे घरातील साहित्याची तोडफोड करुन दिपक खानझोडे यांचे वडील नामे सिताराम खानझोडे यांचे अपहरण करुन तेथुन ते सदर मुलीच्या शोधात मुलाच्या मामाच्या घरी ग्राम मोहजा येथे गेले. तेथे सुध्दा मुलगी न मिळाल्यामुळे तेथील घरातील सामानाची तोडफोड केली. व नवऱ्यामुलाच्या मोबाईलवर फोन करुन मुलगी आणुन दे नाहीतर अपहरण केलेले सिताराम खानझोडे यांना जिवाने मारुन टाकतो अशी धमकी दिली. त्यानंतर ते मोहजा येथुन जालना कडे निघाले. असा घटनाक्रम समजताच सदर गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेवुन स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथील तिन पथक व पोलीस स्टेशन रिसोड चे पथक असे मिळुन सदर आरोपी शोध कामी अहिल्यानगर, संभाजी नगर,जालना येथे रवाना झाले. सदर अपहरण केलेले सिताराम खानझोडे यांना सिताफिने अहिल्यानगर येथुन सुखरुप ताब्यात घेतले व दरोडा टाकुन अपहरण करणारे दोन आरोपी नामे राहुल दिलीप म्हस्के वय 32 वर्ष नागेवाडी जि. जालना व सतिष विनायक जाधव वय 29 वर्ष रा. जालना यास अहिल्यानगर येथुन ताब्यात घेतले व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आकाश छगन गायकवाड यास जालना येथुन ताब्यात घेतले तसेच नवरीमुलगी व एजंट नामे शांताराम कडुजी खराटे रा. मोहजा रोड यास ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदर प्रकरणी पोलीस स्टेशन रिसोड येथे अप क्र 980/25 कलम 318 (4), 333, 140(2), 61(2), 324(4), 351(3), 352 भा. न्या. सं. व अप क्र 981/ 25 कलम 310 (2), 311, 324 (3), 126 (2), भा.न्या.सं. प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदर कारवाई श्री. अनुज तारे, पोलीस अधीक्षक वाशिम, मा. लता फड, अपर पोलीस अधीक्षक वाशिम, व श्री. नवदीप अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि. प्रदीप परदेशी, रामेश्वर चव्हाण, यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा वाशिम व पोलीस स्टेशन रिसोड येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले. सदर गुन्ह्यातील उर्वरीत आरोपीचा शोध घेणे सुरु असुन पुढील तपास पोउपनि शिवचरण डोंगरे पोलीस स्टेशन रिसोड हे करीत आहे.











































