Home बुलडाणा ऐ टी एम फोड़ीसह अनेक प्रकरणात फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास पोलिसांनी ठोकल्या...

ऐ टी एम फोड़ीसह अनेक प्रकरणात फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास पोलिसांनी ठोकल्या बेडया ,

259

 

 

अमिन शाह

बुलढाणा

एटीएम फोड़ीसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक करून मोठे यश मिळविले आहे. तामगाव पोलिस स्टेशनच्या अप. क्र. ०५/२०२४ अंतर्गत दाखल असलेल्या कलम ३९५, ३८०, ४२७,३४ भादवी या गुन्ह्यात तसेच सन 2024 पासूनच्या एटीएम फोड़ी प्रकरणात सतत फरार असलेल्या साजिद खान उर्फ जम्मू झाडी बशीर खान वय ३४, रा. जालना याचा शोध घेण्यासाठी पथक सक्रिय होते.

अखेर आज दि. १० डिसेंबर २०२५ रोजी पथकाने आरोपीला गाठून त्यास ताब्यात घेतले. अटकेनंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी तामगाव पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. या अटकेमुळे परिसरातील एटीएम कटिंग प्रकरणाला महत्त्वपूर्ण कलाटणी मिळाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे व अपर पोलिस अधीक्षक बुलढाणा/खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.

कारवाई मध्ये पोलिस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, हेकॉ एजाज खान, पोकॉ अमोल शेजोल, पोकॉ अजीस परसूवाले, कैलास ठोंबरे, शिवानंद हेलगे यांनी पार पाडली. स्थानिक गुन्हे शाखाच्या तत्पर कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.