Home बुलडाणा बैलगाडीचा बुलेट ला धक्का लागून समोरून येणाऱ्या ट्रक खाली चिरडून पत्नीचा मृत्यू...

बैलगाडीचा बुलेट ला धक्का लागून समोरून येणाऱ्या ट्रक खाली चिरडून पत्नीचा मृत्यू चिमुकला आणि पति दोघेही सुखरूप बचावले ,

642

 

गुलशेर शेख

दुसरबीड….. दुसरीबिडच्या पश्चिमेस नागझरी नाल्याजवळ समोर चालणाऱ्या अज्ञात बैलगाडीला बुलेट गाडीचा धक्का लागल्यामुळे समोरून येणाऱ्या ट्रक खाली जाऊन महिलेचा जागीच मृत्यू लहान बाळ आणि बुलेट चालक दोघे सुखरूप बचावले असल्याची घटना आज संध्याकाळी सात वाजता घडली आहे

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार राहेरी बुद्रुक येथील बळीराम सुरेश गवई फौजी वय 32 व सौ कोमल बळीराम गवई वय 26 राहणार राहेरी बु. हे दोघे राहेरी वरून सासरवाडी लोणार येथे संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान बुलेट गाडी क्रमांकMH 30BK4999 ने जात असताना समोर जाणाऱ्या बैलगाडीला मोटरसायकलचा धक्का लागला व मोटर सायकल थांबल्यामुळे पाठीमागे बसलेल्या सौ कोमल बळीराम गवई या महिला गाडीवरून बाजूला पडल्या एवढ्या मध्ये समोरून वनी वरून नगरला जाणारा ट्रक क्रमांकMH21 BW3344 समोरून जालन्या कडे जात असताना ट्रकच्या चाकाखाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला महिलेसोबत असलेले छोटे बाळ व गाडी चालक बळीराम सुरेश गवई दोघेही सुखरूप बचावले घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळावर पोहोचून पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करिता सिंदखेडराजा येथे पाठवीण्यात आले आहे ट्रक चालकाचे नाव मिळू शकले नाही ट्रक किनगाव राजा पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहेत वृत्त लिहेपर्यंत पोलीस स्टेशन किनगाव राजा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे समजते घड़लेल्या अपघाता मुळे हळहळ व्यक्त केली जात आहे ,