
मकसूद अली
संग्रामपुर तालुक्यातील पातुर्डा येथील शेतकरी पशुपालक शेख मुकतार शेख महेताब हे शेती सोबत जोड धंदा म्हणुन शेळी पालन करतात शेतातुन शेळ्याची चराई करुन घरी आल्यावर बकरी ओरडत असल्याने पशुपालक शेख मुकतार यांनी बकरीच्या गोठ्याकडे धाव घेतली बकरी प्रसुती होणार याची जाणीव त्यांना झाली शेख मुकतार व त्यांचे सहकारी लक्ष्मण वानखडे यांनी बकरीची प्रसुती साठी अथक परिश्रम घेतल्याने अखेर बकरीने ८ पाय व १ तोंड असलेल्या विचित्र पिलाला जन्म दिला मात्र जन्मलेले बकरीचे विचित्र पिल्लु अर्ध्या तासात मरण पावले बकरीच्या विचित्र पिलाची बातमी वाऱ्या सारखी सर्वत्र पसरली बकरीच्या विचित्र पिलास पाहण्यासाठी नागरिकांनी शेख मुकतार यांच्या गोठ्याकडे धाव घेतली बकरीचे विचित्र पिल्लु पाहुन आश्चर्य व्यक्त करित होते ,












































