Home बुलडाणा चिखली-मेहकर रस्त्यावर भीषण अपघात; ट्रक ची आयशरला जोरदार धडक!

चिखली-मेहकर रस्त्यावर भीषण अपघात; ट्रक ची आयशरला जोरदार धडक!

245

 

बुलडाणा ,

चिखली-मेहकर मार्गावरील नांद्रा फाटा येथे आज (२० डिसेंबर)आज रात्री ट्रक आणि आयशरमध्ये जोरदार टक्कर झाली हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये आयशर चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.त्याला तत्काल मेहकर ग्रामीण रुग्णालयात पाठवन्यत आले आहे नांद्रा फाट्याजवळ (ता .मेहकर)ट्रक आणि आयशरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात आयशर चालक कॅबिनमध्येच अडकून गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात त्याचे दोन्ही पाय पूर्णपणे निकामी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अपघातानंतर समोरील ट्रक चालक आपली गाडी सोडून घटनास्थळावरून फरार झाला आहे.
अपघाताचा आवाज होताच रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी आपली वाहने थांबवून मदतीसाठी धाव घेतली. आयशरचा समोरील भाग चक्काचूर झाला होता, ज्यामध्ये चालक अडकला होता. उपस्थित प्रवाशांनी मोठ्या शर्थीने प्रयत्न करून आयशरमधील गंभीर जखमी चालकाला बाहेर काढले. घटना स्थळी मेहकर पोलिस पहोचले असून बातमी लिहोस्टर जख्मी आयशर चालकचे नाव माहित होउ शकले नाही ,