
अमीन शाह
बुलडाणा ,
चिखली-बुलढाणा रोडवरील
मालगणी फाट्यानजीक पडलेले मोठे बाभळीचे झाड अखेर प्रशासनाच्या तत्पर कार्यवाहीने हटवण्यात आले आहे. आज दुपारी तीन वाजता वादळी वारे आणि पावसामुळे झाड रस्त्यावर कोसळले होते होते ज्यामुळे दोन्ही बाजूंनी ३ किलोमिटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच चिखली चे ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीसांची सर्व टीम आणि संबंधित प्रशासन युवा सामाजिक कार्यकर्ते विष्णू आव्हाळे, सरपंच सतीश भुतेकर यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी व वाहन चालकांनी तातडीने उपाययोजना करत झाड हटवण्या साठी यंत्रणा राबवली दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर झाड बाजूला काढण्यात आले, आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.












































