Home यवतमाळ यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीतील पाण्याचे हौद गेले चोरीला…!

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीतील पाण्याचे हौद गेले चोरीला…!

383

मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या हौदावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आशीर्वादामुळे अतिक्रमण…

यवतमाळ – यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत धामणगाव मार्गालगत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या हौदासमोर अनधिकृत व्यावसायिकांनी अतिक्रमण करून मुक्या जनावरांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कंपाउंडलगत तत्कालीन समितीने बांधलेला जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या हौदावर अवैध व्यावसायिकांनी पक्की दुकान थाटून मुक्या जनावरांना पाणी पिण्यापासून वंचित केल्याचा आरोप यवतमाळ शहरातील ज्येष्ठ नागरिकाकडून होत आहे.
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळांनी जनावरांना पाणी पिण्यासाठी धामणगाव मार्गालगतच्या कंपाउंडलगत पिण्याच्या पाण्याचा हौद बांधला होता. या हौदात बाजार समितीच्या विहिरीतून पाणी पुरवल्या जात होते. त्यामुळे जनावरांची तृष्णा तृप्ती होत होती मात्र काही वर्षापूर्वी काही व्यावसायिकांनी या हौदासमोर दुकाने थाटल्यामुळे शहरातील मुक्या जनावरांना पाणी पिण्याची सोय राहिली नाही. अशा व्यावसायिकांचे अतिक्रमीत दुकाने हटवून जनावरांसाठी हौद मोकळा करून द्यावा. अशी मागणी सध्या यवतमाळ शहरात जोर दिसताना दिसत आहे.