Home बुलडाणा 24 सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाकरिता मा. निवडणूक निरिक्षक म्हणून नरेश झा यांची...

24 सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाकरिता मा. निवडणूक निरिक्षक म्हणून नरेश झा यांची नियुक्ती ,

128

 

नरेश झा यांची नियुक्ती ,

अमीन शाह

सिंदखेडराजा ,

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूकीचा कार्यक्रम मा. राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 च्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे घोषित केला आहे. राज्यात एकाच टप्प्यामध्ये दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा साठी मतदान घेण्यात येणार आहे. या पार्श्वभुमीवर मा. राज्य निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 23 चिखली व 24 सिंदखेड राजा या विधानसभा मतदार संघाकरिता मा. निवडणूक निरिक्षक (सामान्य) म्हणून नरेश झा, हे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9226152955 असा आहे व त्यांचे संपर्क अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा हे असून मा.निरिक्षक यांचे निवासस्थान शासकीय विश्राम गृह, बुलढाणा येथे राहणार आहे.

विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 23 – चिखली व 24 सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाकरीता उपरोक्त नमुद.निरिक्षक हे जिल्हया मध्ये दाखल झालेले असून कोणत्याही राजकीय पक्षांची, उमेदवारांची, नागरीकांची काही तक्रार असल्यास वरील क्रमांकावर सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत त्यांच्याशी संपर्क साधता येईल.