Home बुलडाणा डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या बद्दल मुस्लिम समाजात नाराजी चे वातावरण

डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या बद्दल मुस्लिम समाजात नाराजी चे वातावरण

29

 

मुस्लिम समाज मतदानातून आपली नाराजी वयकत करणार ?

 

अमीन शाह
सिंदखेडराजा-

गेल्या काही दिवसां पूर्वी
महंत रामगिरी महाराज यांनी हजरत महोम्मद पैगंबर यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले होते त्या नंतर आमदार नितेश राणे यांनी मुस्लिमांना मस्जिदीत घुसून मारण्याची भाषा केली होती त्याचे पडसाद राज्यभर उमटून मुस्लिम समाजा तर्फे ठीक ठिकाणी मोर्चे आंदोलन काढून या दोघांचा निषेध वयकत करण्यात आला होता सिंदखेडराजा मतदार संघात ही ठीक ठिकाणी निषेध वयकत करीत आंदोलन करून निवेदन देण्यात आले होते या नंतर अनेक सत्ताधारी आमदारांनी ही या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते मात्र सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ , राजेंद्र शिंगणे यांनी त्या वेळी चुप्पी साधली होती व ते एक शब्द ही बोलले नवहते ,

नेहमी प्रत्येक निवडणूकित मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मते डॉ. राजेंद्र शिंगणे यांना मिळत होती मात्र या वेळी कोणाला एक ना सांगता अचानक डॉ , राजेंद्र शिंगणे हे मुस्लिम विरोधी असलेल्या पक्षात व सरकार मध्ये शामिल झाले होते त्या मूळे ही मुस्लिम समाजात त्यांच्याविषयी नाराजी पसरली होती पाच वर्षे सतेत असतांना त्यांनी ग्रामीण भागातील मुस्लिम समाज बांधवाच्या भल्या साठी राज्य शासना कडून कोणताही निधी उपलब्ध करून दिला नाही त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काही एक प्रयत्न केले नाही मुस्लिम समाजाच्या हितासाठी कोणतेही कार्य केले नाही सुरवाती पासून नेहमीच त्यांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांची साथ देणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अँड , नाझेर काजी यांनी ही या निवडणुकीत डॉ , शिंगणे साहेबांची साथ या वेळी सोडली असल्याचे दिसत आहे त्यांनी ऐकला चलो चा नारा दिला असल्याचे दिसून येत आहे लवकरच मतदार संघात ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे समजत आहे ,

आठवण , ?

अनेक राजकीय नेत्यांनी महंत रामगिरी महाराज व आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध वयकत केला होता . अजितदादा पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी, माजी मंत्री बच्चु कडु, सत्ताधारी पक्षातील उदय सामंत यांनी निषेध व्यक्त करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती त्याचबरोबर बुलडाणा येथील माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, कॉग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे , जयश्री ताई शेळके यांनी देखील महाराजांचा व नितेश राणे यांचा निषेध वयकत केला होता मात्र सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार
डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी कुठेही निषेध व्यक्त
केला नवहता त्यांनी या वर चुप्पी साधली होती आता आपल्याला पूर्वी सारखाच मुस्लिम समाजाची साथ मिळेल अन आपण निवडून येऊ असे स्वप्न उमेदवार डॉ , राजेंद्र शिंगणे हे पाहत आहे ,

फक्त मतांसाठी डॉ , शिंगणे हे मुस्लिमांचा वापर करतात परंतु जेव्हा मुस्लिमांच्या भावनिक भावनेचा भंग होतो तेव्हा आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे मुस्लिमांच्या मुद्याकडे साधे लक्ष देखील देत नाही निषेध सुद्धा व्यक्त करत नाहीत. समाजात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यासाठी ही काही विशेष प्रयत्न केले असल्याचे दिसत नाही असा आरोप आज मुस्लिम समाजातील उच्च शिक्षित तरुण आज करीत आहे ,