Home सोलापुर त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि . ८ रोजी वागदरीत  महिला...

त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि . ८ रोजी वागदरीत  महिला कार्यशाळा शिबीर

138

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट , दि. ०७ :- तालुक्यातील वागदरी येथे दि. ८ रोजी नेहरू युवा केंद्र सोलापूर व सिद्धार्थ सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे व गौतम बाळशंकर यांनी दिली आहे.

वागदरी येथील परमेश्वर मंदिर सभागृहात आयोजित या कार्यशाळा शिबीराचे उध्दघाटन आ.सचिन कल्याणशट्टी यांचे हस्ते होणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा समन्वयक नेहरू युवा केंद्र सोलापूरचे अजित कुमार ,पंचायत समिती सभापती सुनंदा गायकवाड, पंचायत समिती विरोधी पक्ष नेते गुंडप्पा पोमाजी, गट सचिव संघटनेचे सचिव श्रीशैल ठोंबरे ,तहसीलदार अंजली मरोड,उद्योग मार्गदर्शक तथा जेष्ठ पत्रकार अरविंद जोशी ,प्रतिक दनाळे ,शैला केशवरास ,मनिषा सुरवसे,सुभाष चव्हाण , सुनिल सावंत आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.या वेळी
उत्कृष्ट महिला बचत गटांना पुरस्कार वितरण
त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नेहरू युवा केंद्र सोलापूर व सिद्धार्थ सोशल फाउंडेशन यांच्या कडून

उत्कृष्ट महिला बचत गटांना पुरस्कार वितरण

1) राणी लक्ष्मी स्वयं सहाय्यता समुह, साफळे ता अक्कलकोट

2) मीन स्वयं सहाय्यता समुह, करजगीता अक्कलकोट

3) सहेली स्वयं सहाय्यता समुह, उडगी ता अक्कलकोट

4) वैष्णवी महिला स्वयं सहाय्यता समुह वागदरी ता अक्कलकोट

5) सखी महिला स्वयं सहायता समूह वागदरी ता अक्कलकोट

यावेळी
आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी व सभापती सौ सुनंदा ताई सिद्धार्थ गायकवाड तहसिलदार अंजली मरोड यांना मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे