
लक्झरी च्या काच तोडून प्रवाश्यांनि मारल्या बाहेर उड्या ,
अमीन शाह
बुलडाणा ,
. लोणार तालुक्यातील वीर पांग्रा (चोर पांग्रा )येथे. सकाळच्या सुमारास पुण्याहून वाशिम कडे जाणाऱ्या लक्झरी बस क्रमांक.MP 13.ZF.6651. ही भरधाव वेगाने असल्यामुळे वीर पांगरा येथे असलेल्या ब्रेकर वर आदळून या गाडीचा ताबा सुटला आणि या गाडीने घरासमोर असलेल्या वाहनांना धडक दिली यामध्ये ट्रॅक्टर. मळणी यंत्र मेहकर कडून जाणारा एक ट्रक कार अश्या अनेक वाहनांना धडक दिली झालेल्या अपघातात वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल आहे परंतु. यामध्ये कोणत्याही प्रकारे जीवित हानी झाली नाही. गाडीतील काही प्रवाशांना किरकोळ मार लागला असून काही प्रवासी मात्र खिडकी तोडून बाहेर निघाले. लक्झरी चालकाला सुद्धा किरकोळ प्रमाणात मार लागलेला असून या सर्वांना बीबी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये. उपचारासाठी दाखल करण्यात आले या संपूर्ण घटनेचा तपास बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील. परमेश्वर शिंदे , बोरे हे करीत आहेत.












































