Home सोलापुर उद्योगधंद्यातून प्रबळ राष्ट्रनिर्मिती करायची आहे – रमेश भाकर

उद्योगधंद्यातून प्रबळ राष्ट्रनिर्मिती करायची आहे – रमेश भाकर

282

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट , दि. ०६ :- आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस पोटा पाण्यासाठी संघर्षमय जीवन जगत आहे.वाढत्या लोकसंख्येमुळे मानवाच्या गरजा वाढल्या आहेत.प्रत्येकाला नोकरी लागणे अवघड झाले आहे.म्हणून प्रत्येकांनी उद्योगधंदे सुरू करावेत आणि स्वाभिमानी बनवावेत असे प्रतिपादन राष्ट्रीय विणकर सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश भाकरे यांनी केले.

राष्ट्रीय विणकर सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश आणि सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण महास्वामी मठ ट्रस्ट व चौडेश्वरी हटगार महिला बहुउद्देशीय संस्था अक्कलकोट आयोजित ” विणकर मेळावा, अक्कलकोट” श्री मृत्यूनंजय स्वामीजीच्या दिव्य सानिध्यात शरणमठ अक्कलकोट येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाचे उध्दघाटन राष्ट्रीय विणकर सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश भाकरे यांच्या हस्ते झाला., अध्यक्षस्थानी माणिक निलगार होते प्रारंभी प्रतिमा पूजन मल्लप्पा निरोळी वागदरी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रीय विणकर सेवासंघ डॉ.अनिल कांबळे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय विणकर सेवासंघ सुनील मेटे, अध्यक्ष अक्कलकोट तालुका राष्ट्रीय हटगार कोष्टी समाज सुनंदाताई अष्टगी, काशिनाथ थिटे, ओमशंकर हुलगेरी, सिदारुढ जावळकोटी, राष्ट्रपती प्रशस्तीपत्र पारितोषिक विजेत्या मैंदर्गी पार्वतीबाई नागठाण, इ सेवा केंद्र मुंबई अतुल यादव, सिद्धाराम मडचाणे, गौरव पानोरेकर,तुपेकर, बोने गुरुजी, भारत भंडारे, संपादक विजय झुंजा ,चौडप्पा भैरामडगी,चंद्रकांत कळसे ,बसलिंगप्पा देगील ,शिवानंद सुगरे.चंद्राम चिकळ्ळी ,बसवराज नडगेरी ,बसवंतराव वळसंग ,शिवशरण वमने,मुतण्णा दुधगी उपस्थित होते.