Home बुलडाणा रेती तस्करांना अभय देणाऱ्या सिंदखेडराजा तहसीलदार सचिन जयस्वाल यांची चौकशी करून कारवाईची...

रेती तस्करांना अभय देणाऱ्या सिंदखेडराजा तहसीलदार सचिन जयस्वाल यांची चौकशी करून कारवाईची अ . भा . ग्रा . पत्रकार संघाची जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे मागणी ,

20

 

बुलढाणा सचिन खंडारे

खडकपूर्णा नदीपात्रामधून काही महिने अधिकृत पासवर रेती विक्री सुरू होती .रात्रीच्या वेळेला मलकापूर पांगरा शेंदुर्जन साखरखेर्डा या भागामध्ये विना नंबर रेतीचे टिप्पर अवैधपणे चालू होते.चौफुलीवर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या मार्फत एक हेर ठेवल्या जात होता तो हेर कोण आले कोण गेले यांचे संपूर्ण माहिती द्यायचा . विना नंबर चे टिप्पर मलकापूर पांगरा मधून भरधाव वेगाने जात असल्यामुळे अनेकदा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता स्थानिक लोकांनी गोपनीय माहिती दिल्यामुळे मलकापूर पांगरा येथील दैनिक महाभुमी तसेच चौफेर बुलढाणा चे मुख्य संपादक गंगाराम उबाळे यांनी दिनांक 23 डिसेंबर रोजी गावातून अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती सिंदखेड राजा तहसीलदार सचिन जयस्वाल यांना मोबाईल वरून दिली होती .परंतु याकडे तहसीलदार जैस्वाल यांनी कानाडोळा केला .त्यानंतर दिनांक 26 जानेवारी रोजी गंगाराम उबाळे यांनी दैनिकांमधून अवैध रेती वाहतूक असल्याची बातमी प्रकाशित केली .त्यानंतर दुसऱ्या दिवशीही अवैध रेती विना नंबरच्या टिप्पर सुरू असल्याची माहिती उबाळे यांनी तहसीलदार यांना दिले .परंतु सिनखेडराजा तहसीलदार सचिन जयस्वाल यांनी कुठलेही म्हणणे ऐकून न घेता पत्रकार गंगाराम उबाळे यांना दूरध्वनीवरून फोन करून उरमटपणाची भाषा वापरून तुम्ही पत्रकार लोक फालतुगिरी करता असे म्हटले . शिवाय तुम्हा पत्रकारांना कुठलेही काम धंदे नसून माझे काहीही वाकडे होत नाही असे म्हटले . त्यामुळे तहसीलदार सचिन जैस्वाल यांनी पत्रकार उबाळे यांच्याशी कोरमटपणाची भाषा वापरून एक प्रकारे पत्रकारांचा अपमान केला असून त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे
या निवेदनावर ,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे,जिल्हा उपाध्यक्ष अशोक इंगळे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन खंडारे,सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष प्रल्हाद देशमुख,सिंदखेडराजा प्रसिद्धीप्रमुख गंगाराम उबाळे,
जिल्हा उपाध्यक्ष बबन सरकटे,
जिल्हा सचिव राजेंद्र मोरे,यांच्या सह्या आहेत,
आता जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ..ठरेल .