Home मुंबई चक्क मामीनेच केलं अल्पवयीन भाच्यावर बलात्कार ,

चक्क मामीनेच केलं अल्पवयीन भाच्यावर बलात्कार ,

65

चक्क मामीनेच केलं भाच्यावर बलात्कार ,

अमीन शाह ,

मामाच्या घरी राहायला आलेल्या १६ वर्षीय भाच्यावर ४० वर्षीय मामीने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना मुंबईत घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून ताडदेव पोलिसांनी विकृत मामीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय अत्याचार पीडित मुलगा मूळ उत्तर प्रदेशातील रहिवासी असून त्याचा मामा मुंबईच्या ताडदेव परिसरात राहतो.
वर्षभरापूर्वी पीडित मुलगा मामाच्या घरी राहण्यासाठी आला होता. यावेळी पती घरात नसल्याचा फायदा घेत मामीने भाच्याला धमकावले. तुला गावी पाठवून देईन, असं म्हणत विकृत मामीने भाच्यावर जबदस्तीने अतिप्रसंग केला.

याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. दरम्यान, मामीचं घृणास्पद कृत्य दिवसेंदिवस वाढत होतं. पती घरात नसताना ती भाच्यावर अत्याचार करत होती. यादरम्यान, भाच्याने अनेकवेळा मामीच्या कृत्याला विरोध केला.

तेव्हा मामीने त्याला जेवणही देणे बंद केले. तसेच अनेकदा त्याला मारहाण देखील केली. मार्च २०२३ पासून हा प्रकार सुरू होता. अखेर मामीच्या कृत्याची माहिती मुलाने आपल्या आईला सांगितली.
मुलावर अत्याचार झाल्याचे कळताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. पीडित मुलाच्या कुटुंबियांनी तातडीने मुंबई गाठत मामी विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. जेव्हा हे प्रकरण पोलिसांत गेलं, तेव्हा भाचा २० वर्षीय असून आम्ही सहमतीने संबंध ठेवल्याचा दावा त्या महिलेने केला.
मात्र, जेव्हा पोलिसांनी सर्व प्रकरणाची चौकशी केली असता, भाच्याचं वय १६ वर्ष निघालं. याप्रकरणी पोलिसांनी विकृत महिले विरोधात बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिकचा तपास ताडदेवी पोलीस करीत आहेत.