Home मराठवाडा ज्ञानराधा ‘ वर ज्यांचा विश्वास नाही असे गुंतवणूकदार आपल्या ठेवी घेवून जावू...

ज्ञानराधा ‘ वर ज्यांचा विश्वास नाही असे गुंतवणूकदार आपल्या ठेवी घेवून जावू शकतात,फक्त गर्दी करू नका ‘ – व्यवस्थापक हाडुळे यांचे आवाहन

74

 जालना /लक्ष्मण बिलोरे

– ज्ञानराधा मल्टिस्टेट बँके अफवा उठविली जात आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे ज्ञानराधाच्या कामकाजावर विपरित परिणाम होत आहे. अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका. ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत. ज्ञानराधा मल्टिस्टेट बँकेतील ज्या ठेवीदारांचा विश्वास नसेल ते आपल्या ठेवी कधीही घेवून जावू शकतात.फक्त गर्दी करू नका. आणि आपल्या ठेवी शिस्तीमध्ये काढून घेवून जावू‌ शकतात.असे आवाहन ज्ञानराधाचे व्यवस्थापक यांनी केले आहे.तिरूमला उद्योग समुहाच्या तपासणीसाठी आयकर विभागाचे काही अधिकारी तपासणी करत आहेत.त्या पार्श्वभुमीवर ज्ञानराधा मल्टिस्टेट बँकेच्या व्यवहाराबाबत बाहेर काही अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे.आयकर विभागाच्या या तपासणी नियमित असतात. या तपासणीचा आणि उठवलेल्या अफवांचा संबंध जुळवून ठेवीदार आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी बीड येथील मुख्य शाखेत दिवसभर गर्दी करत आहेत.’तुमच्या ठेवी आहेत.त्या काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे.ठेवीदार जेव्हा ज्ञानराधा मल्टिस्टेट बँकेत ठेवी काढून घेण्यासाठी येतात तेव्हा त्यांना त्यांच्या ठेवी सन्मानाने परत केल्या जातील.ज्ञानराधा मल्टिस्टेटचे कामकाज व्यवस्थित असून सुरक्षित आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या ठेवीदारांना एकच विनंती आहे.आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी करू नये.शिस्तीत आपल्या ठेवी काढून घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा.ज्ञानराधा मल्टिस्टेट बँकेतील ठेवी काढून घेतांना कोणतीही आडकाठी मध्ये येणार नाही. असा विश्वास ज्ञानराधा मल्टिस्टेट बँकेचे व्यवस्थापक हाडुळे यांनी दिला.