Home बुलडाणा इसरुळ येथील त्या प्रकरणाचा छडा लावणार; कुठल्याही परिस्थितीत आरोपींची गय केली जाणार...

इसरुळ येथील त्या प्रकरणाचा छडा लावणार; कुठल्याही परिस्थितीत आरोपींची गय केली जाणार नाही – ठाणेदार विकास पाटील

253

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव मही:-चिखली तालुक्यातील मौजे इसरुळ येथील अवैध रेतीटिप्परने चिखली तहसिल चे नायब तहसीलदार डॉ.संतोष मुंढे यांच्यावर जिवघेणा हल्ला केल्याने या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,दि.७सप्टेंबर २०२३रोजी चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे-शेळगाव आटोळ-इसरूळ या भागात राञीला महसुलचे पथक अवैध रेती माफियावर गस्त घालत असताना नायब तहसीलदार डॉ.संतोष मुंढे यांना भरधाव टिप्परने जिवे मारण्याचा प्रयत्न केला ही घटना निंदनीय आहेच.परंतु कर्मचारी म्हणतात ना भाऊ-भाऊ असतात या उक्तीप्रमाणे अवैध रेती माफियावर वचक बसविण्यासाठी सहा सदस्यीय समिती असते.त्या समितीत सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील,आरटीओ,महसुल प्रशासन आणि पोलीस कर्मचारी (सुरक्षेसाठी)असतात.त्यात ठाणेदार यांची भुमिका संशयास्पद असल्याच्या बातम्या काही वृत्तपत्रात झळकल्या खर्या पण आज आमचा बंधु नायब तहसीलदार उद्या आमच्यावरही ही वेळ येऊ शकते.तर पोलिस, आरटीओ, महसुल प्रशासन असो की स्थानिक सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील असो यांनी जर ते प्रशासनाला मदत करत असतील तर त्यांना ही मदत करणे ही आमची जबाबदारी ठरते.व यातील फिर्यादी चिखली येथील नायब तहसीलदार ‌डाॕ.संतोष मुंढे यांच्या फिर्यादीवरून दि.७ सप्टेंबर २०२३ रोजी अवैध टिप्पर चालक व शासकीय कामात अडथळा निर्माण करणार्या बोलेरो चालकाविरोधात ३०७,३५३,७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याच दिवशी प्राथमिक तपास पीएसआय राठोड यांनी केला असुन घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार विकास पाटील यांनी स्वताहाकडे घेतला आहे.सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी यापूर्वीच पीएसआय गोरे, पोहेकाॅ सोनकांबळे, पोहेकाॅ पोफळे यांचे पथक स्थापन केलेले आहे.गुन्ह्यात आरोपीने टिप्पर पळवुन जाण्यासाठी अडथळा निर्माण केलेले वाहन बोलेरो ही चिखली येथील गोरक्षवाडी येथुन बेवारस स्थितीत आढळुन आली असता त्यासंबंधी बोलेरोची आरटीओ कार्यालयातील सविस्तर माहिती मागितली असता चेंचीस नंबर आणि इंजिन नंबर फिर्यादी ने तक्रारीत दिलेल्या बोलेरोची नंबरशी हुबेहूब मिळाल्याने सदर बोलेरो ही अंढेरा पोलिस स्टेशन मध्ये जमा करण्यात आली आहे.तसेच आरोपींना शोधण्यासाठी अनेकवेळा चिखली येथे गेलो असता परंतु आरोपी घरी मिळुन आले नाही.आरोपीने आपले वास्तव्य बदलले असुन गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही आरोपी शोधण्यासाठी सतत प्रयत्न करत आहोत.
तसेच अशा प्रकारचे गुन्हे अंढेरा पोलिस स्टेशनला यापुर्वी दाखल असून यापुर्वीचे ठाणेदार तथा सध्याचे ठाणेदार यांनी महसुल प्रशासन अवैध रेती माफियावर कारवाई करण्यासाठी जात असताना पोलिसांची मदत घ्यावी असे आवाहन केले आहे.असे असताना इसरुळ येथील कारवाई साठी जात असताना पोलिसांची मदत घेतली नाही.पोलिसांची मदत घेतल्याने भविष्यातील अशा घटना नक्कीच टाळता येतील.महसुल प्रशासनाला लागेल तेव्हा पोलिस प्रशासन मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे तसेच सदर आरोपींना शोधण्यासाठी पथके स्थापन केले असुन आरोपीची कदापी गय केली जाणार नाही.तसेच आरोपीला बेड्या ठोकल्या शिवाय शांत बसणार नाही.असे प्रतिपादन अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना केले.