Home यवतमाळ ग्राहकांना नाहक त्रास देणारा तो लाईनमन कोण?

ग्राहकांना नाहक त्रास देणारा तो लाईनमन कोण?

134

घाटंजी शहरातील घाटी परिसरातील नागरिक एका लाईनमन मुळे परेशान झाले असल्याचे सांगितले जात आहे.विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करून घाटी परिसरात एक लाईनमन नागरिकांच्या घरी विद्युत बिल वसुलीसाठी जाऊन पैसे द्या.अन्यथा लाईन कट करतो असे सांगून ग-हाकांना नाहक त्रास देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.सदर लाईनमन नागरिकांच्या घरात माणुस नसले तरी महीला सोबत उद्धट भाषेचा वापर करून लाईन कट करण्याची धमकी देत असल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.नव्याने आलेला लाईनमन हा अरेरावीची भाषेचा वापर करत असल्याने घाटी परिसरातील नागरिक त्रस्त झाले असल्याचे दिसून येत आहे.संबधित विभागाच्या अधिकारी ने या लाईनमनची बदली करावी कींवा त्यांची अरेरावीची भाषा सुधारावी अशी मागणी घाटी परिसरातील नागरिक करीत आहे.