Home बुलडाणा नोकरीच्या शोधात निराशा आल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या.

नोकरीच्या शोधात निराशा आल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या.

147

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा :-अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणारे अंत्री खेडेकर येथील अमरदीप अंबादास मोरे वय अठरा वर्षे हा आयटीआय करून नोकरीच्या शोधात होता.दरम्यान चिखली येथे रोजगार मेळावा सुरू असताना रोजगार मेळावा मध्ये गेला असता एक दिवस गेला परंतु दुसऱ्या दिवशी गेला नाही.त्याला रोजगार मेळावा मध्ये निराशा झाल्यामुळे त्यांनी दिनांक ९ सप्टेबर रोजी सकाळी घरातून निघून आपल्या गट नंबर ११०४ मधील शेतामध्ये जाऊन पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. अमरदीप हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता.त्याने बारावी करून आयटीआय मध्ये प्रवेश केला होता.व आयटीआय सुद्धा कंम्प्लीट झाला होता.अमरदीप नोकरीच्या शोधात असल्यामुळे त्याला त्यामध्ये निराशा आल्यामुळे त्याने आपली जीवनयात्रा सकाळी शेतामध्ये जाऊन गळफास घेऊन संपवली त्यामुळे अंत्री खेडेकर येथे शोककळा पसरली आहे.