Home यवतमाळ घाटंजी येथे भारतीय जनता पक्षातर्फे घर चलो अभियान..!

घाटंजी येथे भारतीय जनता पक्षातर्फे घर चलो अभियान..!

150

➡️ माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांची प्रमुख उपस्थिती..!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी : घाटंजी येथे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री व राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर व भाजपाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘घर चलो अभियान’ अंतर्गत घाटंजी शहरातील शिवाजी चौक पासून मुख्य रस्त्यावरून पायदळ जात नागरिकांना भेटी दिल्या. केंद्र सरकारद्वारा राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती व कार्याची माहिती दिली. व त्यासंबंधी पत्रकांचे वाटप केले. त्यानंतर घाटंजीतील LSD हाॅल येथे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सोबत संघटनात्मक आढावा बैठक घेतली.

यावेळी ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत जमलेल्या बुथ प्रमुखांतर्फे कलशात त्यांनी गावागावातून आणलेली मुठभर माती जमा करण्यात आली.

यावेळी भाजपाचे घाटंजी तालुकाध्यक्ष सुरेश डहाके, घाटंजी तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे जेष्ठ नेते मधुसुदन चोपडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजू शुक्ला, भाजपा आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रतिक कुळसंगे, जिल्हा सचिव किशोर बावणे, दत्ता कोंढेंकर, विधानसभा प्रभारी नरेंद्र नार्लावार, घाटंजी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे घाटंजी शहराध्यक्ष राम खांडरे, जिल्हा भाजपाविज मोर्चा जिल्हाध्यक्ष मोहन जाधव, भाजपा सोशल मीडिया सेल संयोजक अभिजीत झाडे, भाजयुमो तालुका अध्यक्ष चेतन जाधव, तालुका सरचिटणीस नंदकिशोर डंभारे, भाजयुमो उपजिल्हाध्यक्ष भावेश सूचक, शहर सरचिटणीस मनोज हामंद, भाजपा आदिवासी मोर्चा आर्णी विधानसभा प्रमुख स्वप्निल मंगळे, मोहन कनाके, भाजपाचे घाटंजी शहराचे माजी अध्यक्ष विष्णू नामपल्लीवार, संदीप माटे, अल्पसंख्यक आघाडीचे अध्यक्ष शेख मेहबूब, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ. रीना धनरे व इतर भाजपाचे अनेक पदाधिकारी, शक्तीकेंद्रप्रमुख, बुथप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.