
प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव
देऊळगाव मही:-विदर्भ कोकण ग्रामीण बँक देऊळगाव मही शाखेत श्री विष्णू बाळाजी सानप रा. देऊळगाव मही हे खातेदार होते त्यांचा प्रदीर्घ आजाराने दि.08/01/2023 मृत्यू झाला होता. त्यांनी शाखेत प्रधानमंत्री जिवनज्योती विमा योजनेअंतर्गत विमा घेतलेला होता. त्यांचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर काही दिवसांनी शाखेत आवश्यक कागपत्रांसह या असे त्यांचे वारसदार श्रीमती शितल विष्णू सानप यांना कळविण्यात आले. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून तो दावा विमा कंपनीकडे पाठविण्यात आला आणि योग्य पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर दि.25/07/2023 रोजी विमा कंपनीमार्फत विमा रक्कम खात्यात जमा करण्यात आली.
ही रक्कम दि.07/08/2023 रोजी वारस श्रीमती शितल विष्णू सानप यांना देण्यात आली. यावेळी शाखेचे व्यवस्थापक श्री. किरण गवळी, उप-व्यवस्थापक मिस. निमिता अर्गडे, शाखेचे रोखपाल श्री. नरेश दिघे, श्री. विष्णू देशमुख आणि वारसदार यांचे भाऊ श्री.आकाश मांटे हे हजर होते.












































