
खामगाव
*बुधवार,दिनांक १६ ऑगस्ट २०२३ रोजी, वेळ* *सायंकाळी ५ वाजता कोल्हटकर स्मारक मंदिर,खामगाव येथे आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने वृक्षारोपण व आदर्श शिक्षिका,उपक्रमशील केंद्रप्रमुख,कर्तव्यदक्ष शिक्षण विस्तार अधिकारी,साहित्यिक*
*तथा सामाजिक कार्यकर्त्या वनश्री ऊर्मिला श्रीकृष्णराव ठाकरे यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने “वळून बघतांना”*
*या पुस्तकाचे प्रकाशन आणि सुरेश भट गझल मंच , पुणे प्रस्तुत *”गझल रंग”*दर्जेदार मराठी गझल मुशायरा चे भव्य आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.*
*कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्रीमती भाग्यश्रीताई विसपुते भा.प्र.से, मुख्य* *कार्यकारी अधिकारी जिल्हा* *परिषद बुलढाणा ह्यांच्या शुभहस्ते होणार असून अध्यक्षस्थानी गोविंद नांदेडे मा.शिक्षण संचालक , पुणे हे उपस्थित राहणार आहेत.*
*यावेळी प्रमुख उपस्थिती ॲड.आ.आकाश दादा फुंडकर,विधानसभा सदस्य,मतदार संघ खामगांव,*
*आ.राजेशजी एकडे, विधान*
*सभा सदस्य मतदार संघ* *मलकापूर, आ.धिरजदादा लिंगाडे अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ,आ.*
*रमेशराव बुंदिले माजी आमदार,मतदार संघ* *दर्यापूर ,अशोकभाऊ सोनोने* *प्रदेशाध्यक्ष,भारिप बहुजन* *महासंघ,डाॅ.दादासाहेब कविश्वर अध्यक्ष-पंचशील* *होमॅओपथिक शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव,*
*राजेशजी राजोरे, दैनिक देशोन्नती संपादक , बुलढाणा आवृत्ती,किशोरअप्पा भोसले अध्यक्ष खामगाव प्रेस क्लब,*
*ह.भ.प.शिवदास राहणे पाटील पान्हेरा (खेडी),*
*तालुका-मोताळा ,डाॅ.*
*सदानंद धनोकार मा.*
*सभापती,पं स.खामगाव हे उपस्थित राहणार आहेत*
*तर विशेष उपस्थितीत डाॅ.श्रीराम पानझाडे उपसंचालक प्रशासन, महाराष्ट्र राज्य,पुणे शिल्पा पवार -चव्हाण वरिष्ठ कोषागार अधिकारी, अमरावती,प्रकाश मुकुंद शिक्षणाधिकारी(माध्य)*
*बुलढाणा, बाळासाहेब खरात शिक्षणाधिकारी (प्राथ) बुलढाणा,किशोरजी पागोरे शिक्षणाधिकारी (नियोजन) यवतमाळ,चंदनसिंग राजपूत* *गटविकास अधिकारी,पं.स. खामगाव, जी.डी. गायकवाड* *गटशिक्षणाधिकारी, पं. स. खामगाव,नंदकुमार खरात*
*अधिक्षक,शा.पो.आ, चिखलदरा,या राष्ट्रीय* *कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.*
*मराठी गझल मुशायरा चे सूत्रसंचालन शाहीर श्री. सुरेशकुमार वैराळकर करणार असून किशोर बळी,*
*अमोल शिरसाट,विजया* *लक्ष्मी वानखेडे, नितीन देशमुख,गोपाल मापारी,*
वनश्री ऊर्मिला ठाकरे, योगिता पाटील,शशिकांत कोळी,ज्ञानेश पाटील हे गझलकार “गझलरंग” दर्जेदार मराठी गझल मुशायरा मध्ये गझल सादरीकरण करणार आहेत.
तरी या भव्य दिव्य राष्ट्रीय कार्यक्रमास रसिक मित्रांनी इष्ट मित्रांसह उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजक संजीवनी मल्टिपर्पज एज्युकेशन वुमेन्स अकॅडमी, केंद्रप्रमुख,शिक्षक संघटना,कर्मचारी संघटना,
साहित्यिक मित्र मंडळ व पर्यावरण मित्र मंडळ खामगाव यांनी केले आहे.












































