
प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव
देऊळगाव मही: खैरव येथे शेतकामासाठी जाणाऱ्या मजूर महिलांचे वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात सहा महिला मजूर जखमी झाल्या.

सदर अपघात देऊळगाव मही ते दुसरबीड रस्त्यावर घडला.गंभीर जखमी अवस्थेत या महिला मजुरांना किशोर शिंगणे अनिल शिंगणे यांनी संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉ.अरुण सोनसळे व डॉ जयश्री सोनसळे यांनी तातडीने आरोग्य सेवा दिली.दरम्यान डॉ महेश दंदाले,डॉ सचिन सोनसळे यांनी माणुसकीचे प्रत्यय दाखवत तात्काळ उपस्थित होत गंभीर जखमी पूजा प्रल्हाद कुरधने वय ३५,सविता उमेश भुसारी वय ३८,सरस्वती मैंद वय ४०,तुळसाबाई अंबादास वैद्य वय ६०,रेणुका विठ्ठल पान्नासे वय ३०, सया संजय तायडे वय ३२,गजानन गोंविदा तायडे वय ३५,मनोहर बकाल वय ४५ जखमी रुग्णावर प्राथमिक उपचार केले.यातील गंभीर जखमी रुग्णांना जालना येथे हलविण्यात आले.दरम्यान अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अनिल शिंगणे,किशोर शिंगणे,राम खेडेकर, विशाल पोपळकर,भगवान बोंबले आदींनी मदतीसाठी धाव घेतली व तात्काळ १०८ ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून स्वतः जखमींना मदत केली.












































