Home बुलडाणा समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात तीन ठार ,

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात तीन ठार ,

59

समृद्धी महामार्गावर गाडी थांबून लघवीस जाणे पडले महागात

तिघांचा मृत्यू फरदापुर जवळील घटना

 

दुसरबीड प्रतिनिधी गुलशेर शेख 

महामार्गावर फरदापुर देवळगाव कोड नजीक सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत देवळगाव राजा तालुक्यातील येथील तिघेजण ठार झाल्याची घटना आज दिनांक चार जून रविवार सकाळी चार वाजेच्या दरम्यान घडली कुटुंबे टाटा मॅजिक क्रमांक mh 28az7546 वाहनाने लग्नासाठी मालेगाव कडे जात असताना फरदापुर नजीक चैनल क्रमांक 283 जवळ वाहन थांबून त्यातील तिघेजण लघवी करण्यासाठी जात होते त्याचवेळी मार्गावरून भरदा वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांना उडविले या अपघातात विजय शेषराव मान्टे वय 48 चार तुषार गजानन मांटे वय 34 व ओम विजय मान्टे वय 20 हे तिघेजण ठार झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच फरदापुर पोलीस मदत केंद्राचे पीएसआय शैलेश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मेहकर येथील सरकारी दवाखान्यात रेफर केले आहे मात्र तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघेही मृत असल्याचे सांगितलेसुरेश मांटे देवळगाव राजा पोलीस स्टेशनला हेड कॉ कार्यरत आहे त्यांच्या मुलाचं लग्न वाशिम येथे होतं तेथे लग्न उरकून ही मंडळी रात्री घरी येण्यासाठी निघाली होती यातील काही मंडळी बेळगाव राजा येथे पोहोचली होती व काही मंडळी मागून येत होती

विजय मांटे यांचा मुलगा ओम याचा आज एमपीएससीचा पेपर असल्याने आईने तू मागून ये मी तोपर्यंत डब्बा करते म्हणत आई देऊळगाव राजा पोहोचली व ओम मागून येत होता दरम्यान यांची गाडी फरदापुर नजीक लघुसंखेसाठी थांबली असता हे गाडी जवळ बसण्याकरिता येत असताना समोरून आलेलं पुण्यात वाहन यांच्या गाडीच्या साईड ग्लास खेटून यांना उडवत निघून गेला संबंधित तिघे गाडीजवळ खेटून उभे असता समोरच्या एका साईटच्या टायराखाली अज्ञात वाहनाने उडविले विजय शेषराव मांटे हे जागेवरच मृत्यू झाला तर उर्वरित दोघांना विजय मांटे व तुषार गजानन मांटे मेहकर येथे नेत्यांना त्यांचीही प्राणजोत माळवली हे तिघे राहणार मूड दिग्रस चे होते इतका भयंकर होता की मागेपुढे असणारे लग्नाचे पूर्ण वाहन थांबले असता तेथे आरडा ओरड पसरली होती