
अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर यांना दिले निवेदन

प्रतिनिधी:-रवि अण्णा जाधव
देऊळगाव राजा:-स्थानिक अंढेरा येथील समस्त नागरिकांच्या वतीने दि.१८ मे २०२३ रोजी दुपारी बारा वाजता अंढेरा पोलिस स्टेशन ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या कडे लेखी निवेदन देण्यात आले असुन निष्पाप राधिकाच्या हत्याराला न्यायपालिकेने तात्काळ फाशीची शिक्षा सुनवावी या मागणीचे निवेदन समस्त अंढेरा वासियांच्या वतिने देण्यात आले आहे.
अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तपोवन देवी संस्थान रोहडा येथे दि.१२ मे रोजी एका लग्न समारंभासाठी राधिका विलास इंगळे ही आपल्या आईसोबत लग्नासाठी आली होती.ती दुपारी बेपत्ता झाल्याची माहिती होताच अंढेरा पोलिस स्टेशन कर्मचारी तथा विविध सामाजिक संघटना यांनी हरवलेल्या राधिकाच्या शोध घेतला परंतु राधिका मिळाली नाही.दुसर्या दिवशी पोलीस तपास करत असताना तपोवन देवी संस्थान परिसराच्या पाठीमागे पोलिसांना चिमुकली राधिका मृतदेह दगडी चाळ रचलेल्या अवस्थेत सापडला.सदर घटनेमुळे संपूर्ण समाज मन सुन्न झाले होते.अंढेरासह बुलढाणा येथील वेगवेगळ्या पोलिस पथकांनी तपासाची चक्रे फिरवत अखेर दि.१७ मे रोजी पोलिसांनी पञकार परिषदेत राधिकाच्या हत्याराला रोहिडा येथुन पकडले असल्याची व आरोपीने गुन्हा कबुल केल्याचे पञकार परिषदेत सांगितले.
समस्त मानव जातीला काळीमा फासणारी घटना घडली असुन अशा निष्पाप राधिकावर अत्याचार करुन तिला जावे मारणार्या नराधमाला सदानंद भगवान रोडगे रा. रोहडा याला न्यायपालिकाने तात्काळ फाशीची शिक्षा सुनवावी या मागणीचे निवेदन समस्त अंढेरा वासियांच्या वतिने देण्यात आले यावेळी सुभाष गाडे,कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत सदस्य गजानन कुटे,गणेश मधुकर सानप,दिपक तेजनकर,रमेश केवट,कडुबा सानप,भुषण पन्हाळे साहेब,रामेश्वर मधुकर तेजनकर,शिवानंद सानप,नंदकिशोर देशमुख,समाधान राऊत, निलेश राठोड, रविंद्र तेजनकर (ठाकरे), सुनील राऊत, अंकुश सानप, समाधान जोहरे,करण देशमुख,पञकार राधाकिसन ढाकणे, पञकार ज्ञानेश्वर म्हस्के सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.












































