Home बुलडाणा अंढेरा येथील विजयी उमेदवार निवृत्ती नागरे व संतोष नागरे यांचा सत्कार.

अंढेरा येथील विजयी उमेदवार निवृत्ती नागरे व संतोष नागरे यांचा सत्कार.

83

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव मही:-स्थानिक अंढेरा येथील युवा उमेदवार निवृत्ती कारभारी नागरे यांची नुकत्याच झालेल्या देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मधुन विजयी झाले.त्यांना एकुण १८९मते मिळाली.या निवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवला असुन सिंदखेडराजाचे आमदार डॉ शिंगणे साहेबांचे पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व पहायला मिळाले.
अंढेरा येथील युवा उमेदवार निवृत्ती कारभारी नागरे यांच्या साठी अहोरात्र मेहनत घेणारे अंढेरा गावचे सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तीमत्व मा.सरपंच संतोष नागरे यांनी या निवडणुकीत मेहनत घेत निवृत्ती नागरे यांना विजयी केले.
दि.२९ एप्रील २०२३रोजी अंढेरा गावचे आराध्य दैवत श्री औंन्ढेश्वर मंदिरात जगन साहेब यांच्या हस्ते नारळ फोडुन निवृत्ती नागरे व संतोष नागरे यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी जगन साहेब, सुभाष डोईफोडे, राजुभाऊ राऊत, राष्ट्रवादी तालुका सचिव सुभाष गाडे,रावसाहेब देशमुख,दिनकर सानप, गजानन तेजनकर,बद्री मुंढे, गणेश सानप,संजय डोईफोडे, नंदकिशोर देशमुख, विष्णू बनसोडे,राजु डोईफोडे,गजानन ढाकणे,पञकार राधाकिसन ढाकणे, पञकार ज्ञानेश्वर म्हस्के हजर होते.